KINWATTODAYSNEWS

स्थानिक गुन्हा शाखेने 1 लाख 77 हजार रुपयांचे 9 मोबाईल निजामाबादमधून पकडले

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.23.नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बळजबरीने चोरून नेलेल्या दोन मोबाईल गुन्ह्यांचा शोध घेतला असता ते दोन मोबाईल आणि इतर 7 मोबाईल, 1 लाख 77 हजार रुपये किंमतीचा ऐवज निजामाबाद येथून दोन चोरट्यांना पकडून जप्त केला आहे.

दि.31 ऑक्टोबर 2021 रोजी गोकुळनगर भागातून सुजित विमनलाल यादव यांचा 17 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला होता.

तसेच शिवाजीनगर येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 419/2021 या गुन्ह्यातील मोबाईल चोरीला गेला होता.

याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी निजामाबादमध्ये हे मोबाईल असल्याची माहिती आपल्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांना दिली आणि त्यांच्यासह पोलीस पथक निजामाबाद येथे पाठविले.

पोलीस पथकाने तेथुन शेख अबुबकर शेख इकबाल(24) आणि मोहम्मद खय्युम मोहम्मद खाजा (43) या दोघांना पकडले त्यांच्याकडून शिवाजीनगरमध्ये चोरीला गेलेल्या गुन्हा क्रमांक 419 आणि गुन्हा क्रमांक 393/2021 मध्ये चोरी गेलेले 37 हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले.तसेच या दोन्ही चोरट्यांकडे मिसिंग सदरात पोलीस जप्तरी नोंद असलेले 9 मोबाईल सापडले.त्यांची किंमत 1 लाख 40 हजार रुपये आहे. असे एकूण 1 लाख 77 हजार रुपये किंमतीचे मोबाईल स्थानिक गुन्हा शाखेने शोधून काढले आहेत.या चोरट्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी ही कामगिरी करणारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे,अत्यंत चपळ सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक श्री गोविंदरावजी मुंडे,गुन्हेगारांची खडानखडा माहिती असणारे पोलीस अंमलदार अफजल पठाण,देविदास चव्हाण आणि पोलीस अंमलदार सुरेश घुगे,राजू सिटीकर,दिपक ओढणे आणि गजानन बैनवाड यांचे कौतुक केले आहे

566 Views
बातमी शेअर करा