किनवट ( सा.वा)हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त किनवट शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठाण,किनवट च्या वतीने जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याभोवती दिपोत्सवाने करुन करण्यात आली. प्रतिष्ठानच्या समस्त सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. प्रसंगी चिमुकल्या कु. आदिती आशिष कंचर्लावार हीने सुमधुर आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गायन केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संभाजीनगर भागवताचार्य वेद.शा. श्री दिनेश गुरु कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलतांना असे प्रतिपादन केले की, माँ साहेब जिजाऊंच्या संस्कारात निर्माण झालेल्या राजेंची शिकवण प्रत्येकानेअंगिकारावी केल्यास
कार्यक्रमाची सांगता श्री राजे ग्रुप च्या नृत्य दिग्दर्शिका कु. अंतरा बाभूळकर हीने दिग्दर्शित केलेल्या समुह नृत्याने करण्यात आली. नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.प्रतिष्ठाणच्या वतीने नृत्यात सहभागी सर्वांना सामुहिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा देउन कौतुक व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष आनंदभाऊ मच्छेवार,सुनिल मच्छेवार, विजय जोशी,पवार गुरु स्वामी,ॲड.दिलीप काळे, निलेश भिलवडीकर,आशिष कंचर्लावार, रोहित चाडावर, धीरजचव्हाण,अभय महाजन, मुकुंद लोखंडे, श्रीनिवास ,शिवा ,
राकेश बोंम्पिलवार, बंटी आइलेनिवार, अभिजित वैद्य सुरज सोनटक्के, अमोल कंचर्लावार, उमाकांत कऱ्हाळे, ओंकार गुरुजी, सुनिल पाठक,संजय रेखुलवार या सर्वांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड.दिलीप काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री आशिष कंचर्लावार यांनी केले.
किनवट शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठाण,किनवट च्या वतीने जयंती उत्सवाचे भव्य आयोजन
411 Views