KINWATTODAYSNEWS

आव्हानात्मक काळातील संपूर्ण कसोट्यांना खरे उतरलेल्या जिल्हा प्रशासनाची दोन वर्षपूर्ती*  *जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या कार्यकाळास दोन वर्ष पूर्ण

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.16 बरोबर दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात सर्व सीमा सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद होत्या. ठिकठिकाणी तपासणी नाके लागलेले.अत्यावश्यक व जीवनावश्यक वाहतुकी शिवाय रस्त्यावर एकाही वाहनांची वर्दळ नाही.जी वर्दळ होती ती आरोग्य आणि दवाखान्याशी संबंधित. अशा काळात नांदेड सारख्या विस्तीर्ण जिल्ह्याच्या प्रशासनाची, जिल्हादंडाधिकारी या नात्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्विकारून अत्यंत धैर्याने रोज येईल ती परिस्थिती सावरण्याची जबाबदारी डॉ. विपीन इटनकर यांच्यावर आली. जिल्हा नवीन. जिल्ह्याच्या सीमा नवीन.प्रत्येक तालुक्यातील आरोग्याचे आव्हाने नवीन.

अशा स्थितीत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत शासन, पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याला सावरणे सोपे झाले.
 
वाढती रुग्णांची संख्या,त्यानुरूप लागणाऱ्या बेडची संख्या, औषधांचा पुरवठा,लोकांच्या मानसिकतेला सावरत लोकसहभागातून मदतीचे न्याय्य वाटप,स्वस्त धान्य दुकानातील अन्न-धान्याचा खेड्यापाड्यापर्यंत, दुर्गम आदिवासी भागात शाश्वत व सातत्यपूर्ण पुरवठा याचे नियोजन हे आव्हानात्मक होते.याच्या जोडीला वाढत्या रुग्णांच्या गरजेप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा व त्याच्या वाहतुकीचे नियोजन हेही कसरतीचे होते.

ही सारी आव्हाने नांदेड जिल्हा प्रशासनाने यशस्वीरीत्या पेलून दाखविले. याला महत्वाचे कारण म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व विभाग प्रमुखांत जागविलेले आत्मविश्वास आणि एक टिम म्हणून सतत पर्याय ठेवलेली फळी याला द्यावे लागेल.  
 
जिल्हा प्रशासनातील केवळ आरोग्याच्या सेवेपुरतेच ही आव्हाने मर्यादीत नव्हती. जिल्ह्यातील अतिवृष्टीने, शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कापसाने,बियाणाच्या वेळेवर उपलब्धतेच्या धास्तीने शेतकरी चिंतेत होता.

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपासून ते ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिला आहे त्यांचा घरोघर जाऊन सर्वे करणे,संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीसाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करणे हे एका चांगल्या नेतृत्वाचे आणि संघटन कौशल्य असल्याचे द्योतक ठरले आहे.याचबरोबर सामाजिक न्यायासाठी, दिव्यांगापासून सुनो प्रकल्पापर्यंत लॉयन्स क्लब, नांदेड मधील खाजगी सेवा देणारी हॉस्पिटल्स यांच्या मार्फत झालेले काम मोलाचे आहे.

एक महानगर म्हणून एखादा हेरीटेज मार्ग असावा यासाठी त्याचबरोबर चांगल्या क्रीडाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने शासकीय कार्यालयातील जागेसह टेनीस कोर्ट पासून ज्येष्ठांना सहज व्यायाम करता येईल अशा जिमची उपलब्धी करून देणे हे कार्य दोन वर्षात झाले असे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही.

67 Views
बातमी शेअर करा