KINWATTODAYSNEWS

देगलूर येथे सेवालाल चौकाचे अनावरण* असंख्य महिला बंजारा पारंपरिक वेशभूषेत उपस्थितीत पार पडला

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.17.जिल्ह्यातील देगलूर शहरात उदगीर रोड येथे सद्गुरू सेवालाल महाराज येथे चौक चे अनावरण करण्यात आले.सदरील चौक हे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवासाठी आदर्श ठरेल अशी चर्चा चालू आहे.

यानंतर सेवालाल महाराजांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकताना पूर्वी बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलाच्या पाठीवर धान्य ची गोणी वाहण्याचा होता,भिमानाईक यांना चार पुत्र होते याच्या पैकी सेवालाल महाराज हे जेष्ठ होते.

पूर्वी बंजारा समाज निरिक्षक होता,माल वाहतुकीसाठी बंजारा समाज जगभर भटकत होता त्यामुळे सेवालाल महाराजांनी यांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले.

जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या त्याच बरोबर भव्य संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले आज हि बंजारा समाज मध्ये एक पेहराव आणि एक भाषा टिकून आहे.

सतराव्या शतकामध्ये सेवालाल महाराज यांनी गोरगरीब जनतेला अंधश्रध्देतून बाहेर काढण्याचे काम केले.‘जाणजो छाणजो,पचज माणजो’ या वाक्यातून त्याची चिकित्सक वृत्ती दिसून येते.इंग्रजांविरुध्द उठाव, अन्याय अत्याचार विरुध्द लढा, ‘कोयी केती नानो मोठो छेई’ या वाक्यातून सामाजिक एकोपा आपल्याला पहायाला मिळतो. ‘अनुभवेती सीक जको खरो’ माणूस अनुभवातूनच घडत असतो. सर्व समाज घटकाना एकत्र आणण्याचे काम सद्‌गुरु सेवालाल महाराज यांनी केले आदी जीवनकार्यावर प्रकाश टाकत कार्यक्रम पार पडला.

देगलूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली चौकाचे अनावरण करण्यात आले.या वेळी समाजकल्याण सभापती रामराव नाईक,काँग्रेस चे जिल्हा सचिव दीपक शहाणे, नगरसेवक नितेश पाटील,सुभाष जाधव,बी एम पवार आदी समस्त बंजारा बांधव उपस्थित होते.

तसेच गोर सेना तालुका अध्यक्ष विशाल पवार,नाळू पवार,बालाजी जाधव,राज पवार,धोंडिबा राठोड,सतीश चव्हाण, रमेश चव्हाण आदी च्या अथक परिश्रमाने हे काम पूर्ण झाले त्याच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन समाज बांधवाकडून करण्यात आले.

109 Views
बातमी शेअर करा