KINWATTODAYSNEWS

जिवती येथे मातंग समाज अन्याय निवारण समिती महाराष्ट्र राज्य व लहुजी ब्रिगेड आयोजित जाहीर निषेध मोर्चा चे आयोजन

जिवती/प्रतिनिधी:जिवती येथे मातंग समाज अन्याय निवारण समिती महाराष्ट्र राज्य व लहुजी ब्रिगेड आयोजित जाहीर निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक17/2/2022 रोजी सकाळी दहा वाजता पासून ते तीन वाजेपर्यंत जिवती बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची हत्या करणाऱ्या आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी संविधान बदलने विषयीची भाषा वापरल्यामुळे देशाची माफी मागावी व पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी घेऊन सदरील मोर्चा तहसील कार्यालय जिवती वर धडकणार आहे.
या मोर्चात संबंध मातंग समाज सहभागी होणार आहेत तरी या मोर्चात जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे मातंग समाजाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

591 Views
बातमी शेअर करा