KINWATTODAYSNEWS

अल्पवयीन शीख मुलीवर सामूहिक अत्याचार व खुनाचा घटनेचे निषेध  *आरोपींना फाशी देण्याची मागणी

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.16 .शेजारील राज्यातील हैदराबाद,तेलंगाना येथील सुभाषनगर येथे अल्पसंख्यक शीख समाजातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत सामूहिक दुष्कर्म करून हत्या करण्यात आली.घटना होऊन 48 नंतर होत असले तरी अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.वरील घटनेत समाविष्ट आरोपींना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नांदेडच्या हजूरी सिख संगत तर्फे करण्यात आली.बुधवार रोजी गुरुद्वारा गेट नंबर एक येथे घडलेल्या दुर्देवी घटनेचे तीव्र निषेध करण्यात आले. 

वरील विषयी बुधवार,दि.16 रोजी दुपारी एका शिष्टमंडळाच्या वतीने नांदेडचे जिल्हाधिकारी साहेब यांना या घटनेच्या विरोधात निषेध व्यक्त करणारे निवेदन प्रस्तुत करण्यात आले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्ञानी तेगासिंघ(अस्ट्रेलयीन स्पोर्ट्स), नांदेड,स.सचिंदरसिंघ शाहू यांनी केले.तसेच निवेदन देतांना स. लड्डूसिंघ काटगर,स.करणसिंघ चन्दन,कश्मीरसिंघ भट्टी,स. लखनसिंघ लांगरी,स. जसबीरसिंघ मल्ली,स.राजासिंघ बावरी,स.निरंजनसिंघ कलानी, मीरा कौर टाक,सतनाम कौर बावरी,हरबंससिंघ मल्ली, गुरविंदरकौर रंधावा,सतबीर कौर गाडीवाले, बेबिकौर सिद्धू, पूरबकौर यांचा समावेश होता. 

प्रस्तुत निवेदनात म्हंटल आहे की, हैदराबाद जवळील सुभाषनगर येथील रहिवाशी असलेले स. बचनसिंघ यांची सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे दि. 14 फेब्रुवारी रात्री 9 च्या सुमारास अपहरण करून तिची निर्दयीपणे हत्या करून एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले.त्यापूर्वी मुलीवर सामूहिकपणे अत्याचार करण्यात आले.

घटनेतील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही. माणुसकीला काळीमा फसणाऱ्या या घटनेने समस्त शीख समाज व्यथित झाला आहे.

त्यावरून नांदेडच्या शीख समाजात देखील प्रचंड रोष व्याप्त आहे.नांदेडच्या शीख समाजाच्या भावना तेलंगानाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री पर्यंत पोहचविण्यात यावी.तसेच घटनेतील आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. 

643 Views
बातमी शेअर करा