KINWATTODAYSNEWS

आ.राजेश पवार यांच्या घरकुल मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद! हजारो लाभार्थी नागरिकांची उपस्थिती तक्रारींचा पाऊस

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.16. जिल्यातील धर्माबाद येथील आज पंचायत समितीच्या प्रांगणात लोकप्रिय आ.राजेश पवार यांच्या सूचनेनुसार घेतल्या गेलेल्या घरकुल मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या मेळाव्यास घरकुल लाभार्थी हजारो नागरिकांची उपस्थिती होती व तक्रारींचा पाऊस पडत होता.

2024 पर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून प्रत्येक नागरिकांना स्वतःचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजना चालू केली होती.

त्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळत नव्हते.ही गोष्ट आपल्या नायगाव विधानसभेचे अंतर्गत गाव भेटींच्या दरम्यान आमदार पवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपरोक्त मेळाव्याचे आयोजन केले असून हा नांदेड जिल्ह्यातील पहिलाच मेळावा ठरला आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात धर्माबाद तालुक्याच्या घरकुल योजने संदर्भातील सद्यस्थितीत सद्य स्थितीची माहिती दिली.
त्यानंतर लाभार्थ्यांच्या घरकुला विषयी विषयींच्या तक्रारीचे निराकरण चालू झाले.प्रत्येक गावचे ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.

आणि वेगवेगळ्या टेबलवर ते बसले होते नागरिकांनी आपले नाव का आले नाही? आले तर घरकुल का मिळत नाहीत? अशा स्वरूपाच्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर निकष पात्र असून सुद्धा त्यांना घरकुल मिळत नाही असे लोकं थेट आमदार साहेबाकडे जात होते व त्यांनी तात्काळ त्यावरून निराकारण का केले नाही व पात्र लाभार्थ्यांना घरकुल का दिले नाही असा जाब त्यांनी ग्रामसेवकांना विचारत होते. तद्वतच आमदार राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ पुनमताई पवार यांनीही सर्वत्र फिरत हातात माईक घेऊन सर्वांचे निराकारण करत होते. जो ग्रामसेवक जागेवर नाही त्यांना त्यांनी माईकवरून तंबी दिली.

नंतर तक्रारीचे निराकरण सुरळीतपणे चालू झाले असून ही प्रक्रिया सायंकाळी सात वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

उपरोक्त कार्यक्रमास आ.राजेश पवार सौ.पुनम ताई पवार, सभापती मारुती कागेरू, गटविकास अधिकारी माधव केंद्रे, पंचायत कृषी अधिकारी विश्वास आधापुरे,भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बाबाराव भालेराव,विजय डांगे,बाजार समितीचे संचालक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश अण्णा गौड,तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद रामोड,संजय कदम नागनाथ जिंकले,ईणाणी शेठ,ऍड.चक्रेश पाटील,गफार बेग,यांच्यासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक संदीप गादेवार यांनी केले.
पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती मारुती कागेरू यांनी घरकुल योजना का गती घेत नाही याचे कारण सांगताना फक्त रेती उपलब्ध नसल्यामुळे या अडचणी येत असल्याचे नमूद करीत यावर रामबाण उपाय शोधावा असे सांगितले. त्यावर आमदार राजेश पवार यांनी हा प्रश्न मी मंत्रालयात मांडला असून त्यावर प्रक्रिया चालू आहे आणि रेती संदर्भातल्या नियम व अटी शिथिल होऊन लवकरच गरीब लोकांना आपल्या आवाक्यात रेती उपलब्ध होईल या दिशेने आपले प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.

उपरोक्त मेळावा हाणून पाडण्याचे षडयंत्र अंतर्गत विरोधकांनी केल्याचे स्पष्ट होत असून प्रमुख अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहू नये यासाठी षड्यंत्र रचले गेल्याचे बोलल्या जात असून या गोष्टीचा घरकुल मेळाव्यावर कुठलाच प्रतिकूल परिणाम झाला नसून हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून आपल्या घरकुल योजने संदर्भातली सद्यस्थिती जाणून घेतली.हे एक आ. राजेश पवार यांचे मोठे यश असून भविष्यात सर्वांना निकषपात्र घरे मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.

401 Views
बातमी शेअर करा