नांदेड :- बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशिल युवक जागरूक शिक्षीत कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबनाचा स्विकार हि सर्वश्रेष्ठ गोष्ट असते. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त ,शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे. या संघटनेच्या नांदेड जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष पदी मा .श्री जितेंद्र कुलसंगे यांची निवड आज१५फेब्रुवारी २०२२ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष मा. अॅड.जे.बी.सिडाम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री डी. बी. अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव मा. चिंधू आढळ, राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रंगरावजी काळे साहेब,व इतर नांदेड जिल्ह्यातील बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
बिरसा क्रांती दल नांदेड जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष पदी मा.श्री जितेंद्र कुलसंगे यांची निवड
559 Views