*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13. राज्यात ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीच्या राज्यध्यक्षपदी ऍड.दिनेश सुरेशराव हनवते ग्रामपंचायत अंबाळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांची राज्यध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.व राज्य सचिव पदी दिलीप श्रीराम पांचाळ ग्रामपंचायत जगळपुर तालुका जळकोट जिल्हा लातुर यांची ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीच्या राज्य सचिव पदी आज दि.13/2/ राजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथील ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या बैठकी मध्ये निवड करण्यात आली.
यावेळी कोर कमिटीचे संस्थापक. अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,सहसचिव,कोषाध्यक्ष, सर्व सदस्य जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.
ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यध्यक्ष ऍड.दिनेश सुरेशराव हनवते व राज्य सचिव दिलीप श्रीराम पांचाळ यांना ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व सर्व कोर कमिटी च्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष ऍड.दिनेश हनवते व नवनिर्वाचित राज्य सचिव दिलीप पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुढील काळात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक बांधवांना मायबाप राज्य सरकारकडे कायदेशीर रित्या संघर्ष करून न्याय मिळवून देऊ अशा प्रतिक्रिया मांडल्या.
यावेळी राज्य सचिव दिलीप पांचाळ म्हणाले या गेल्या 14 वर्षापासून च्या संघर्षासाठी राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक बांधवांचे सहकार्य ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समितीला अपेक्षित आहे.
पुढील काळात रोजगार सेवकांच्या न्याय हक्कासाठी लढून संघर्ष करून न्याय मिळवून देऊ प्रास्ताविकामध्ये संस्थापक अध्यक्ष यांनी आमच्या सर्वांच्या शेवटच्या श्वासापर्यंत रोजगार सेवकांसाठी लढून न्याय मिळवून घेऊ असे सांगितले.