मुंबई दि 13 किनवट तालुक्याचे भूमिपुत्र तथा माजी प्रशासनिक अधिकारी यादव लिंबाजी जाधव यांनी आज आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्ष प्रवेश केला यावेळी त्यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, आ अमर राजूरकर यांनी केले. मुंबई येथील काँग्रेस पक्षाचे कार्यालय असलेले टिळक भवन येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात यादव जाधव यांचा प्रवेश झाल्याने किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलणार असून यादव जाधव यांच्या प्रवेशकरिता किनवट येथून मोठ्यासंख्येने त्यांचे समर्थक कार्यकर्ते मुंबई येथे गेले होते ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार , के मूर्ती, बालाजी पाटील, प्रमील नाईक, वसंत राठोड, लकमिपती दोनपलिवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यादव लिंबाजी जाधव यांनी आज आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्ष प्रवेश
949 Views