किनवट ता प्र दि 13
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती किनवट येथील दुर्गा मैदानात दि.16 फेब्रुवारी बुधवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या जयंती सोहळयास तालुक्यातील वाडी, तांडयातील सर्व समाज बांधवानी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किनवट तालुका गोरसेने तर्फे करण्यात आले आहे. या जयंती सोहळ्यास बंजारा समाजातील पारंपारिक वेशभुषा धारण करून महिला तथा बाल, वृध्द सहभागी होणार आहे तर या जयंती सोहळ्यात बंजारा संस्कृती चे दर्शन घडवले जाणार आहे.
सर्वप्रथम भोगपुजा मदनापुर येथील गंगेश्वर महाराज यांच्या हस्ते संपन्न होईल. या जयंती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष पद माजी आ.प्रदिप नाईक भूषविणार आहेत तर युवा नेते सचिन नाईक हे उद्घाटक असतील तर विशेष अतिथी बोथ तेलंगाणाचे आ.बापुराव राठोड हे असतील तर प्रमुख वक्ते गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे.
तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन समाधान जाधव, रामराव जाधव रिठा, प्रविण राठोड, शिवराम जाधव, सुर्यकांत रेड्डी, सुभाष बाबु नायक, प्रकाश गब्बा, बालाजी बामणे, अँड प्रदिप राठोड, काँ अर्जुन आडे, मनोज राठोड, संदिप केंन्द्रे, राहुल नाईक, अनिल पाटील कहाळे, गजानन मुंडे, कचरू जोशी यांची उपस्थिती लाभणार आहे.
या जयंती सोहळयात गोर गावळया कार्यक्रम हिरामण महाराज चिखली, उतम महाराज बेंदी, पांडु महाराज, पारुबाई राठोड यांचा दणदणीत कार्यक्रम होणार आहे.
तर राजगड लेंगी संघ व बंदी टाकळी लेंगी संघ यांचाही बंजारा वेशभुषेत लेंगी कार्यक्रम होणार आहे.
तर या जयंतीच्या निमित्ताने गोर केसुला ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजन करण्यात आले आहे.
किनवट शहरात भव्य, दिव्य स्वरुपात साजरी होणाया या जयंती सोहळयास तालुक्यातील मांडवी, सारखणी, मोहपुर, गोकुंदा, उमरी बाजार, बोधडी, जलधारा, शिवणी, अप्पारावपेठ, ईस्लापुर परिसरातील वाडी, तांडयातील सर्व समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व गोरसेनेचे तालुकाध्यक्ष कैलाश धानावत, उपाध्यक्ष प्रफुल आडे, सचिव इद्रसिंग आडे, कार्याध्यक्ष वासुदेव राठोड, कोषाध्यक्ष कूष्णा राठोड, सहकोषाध्यक्ष ईशवर जाधव, सहकार्याध्यक्ष विनोद पवार यांनी केले आहे.
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती किनवट येथील दुर्गा मैदानात दि.16 फेब्रुवारी बुधवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार
422 Views