*किनवट/प्रतिनिधी* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडीचे *प्रदेशाध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड जिल्हाध्यक्ष किसनभाऊ राठोड* यांच्या उपस्थितीत *विनोद भाऊ पवार*. या काँग्रेसच्या कटृटर कार्यकर्त्याला विमुक्त जाती व भटक्या जमाती किनवट तालुक्याचे अध्यक्षपद देण्यात आले.
विनोद पवार हे *आत्माराम भाऊ जाधव* यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेचे मागिल चार वर्षांपासून चे तालुकाध्यक्ष पद आपल्याकडे राखीव ठेवून अनेक सामाजिक कार्यात आपली योग्यता सिद्ध केली आहे.
या काळात त्यांनी तालुक्यातील अनेक रखडलेल्या प्रश्नांना कामीं लावलें
त्यांनी ही जबाबदारी पार पाडीत असताना त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचार आणि प्रसारातही मोठीं भुमिका पार पाडली.
त्यांच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष किसन भाऊ राठोड यांनी त्यांची किनवट तालुका विमुक्त जाती व भटक्या जमातीचे तालुकाध्यक्षपदी निवड करून त्यांनी केलेल्या कार्याची जणू पावती त्यांना दिली आहे.
त्यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग तालुक्यात असल्यामुळे व त्यांच्यातील संघटन कौशल्यामुळे निश्चितच पक्षवाढीसाठी मदत होईल.
त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यात सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.