KINWATTODAYSNEWS

मराठवाड्याचा भाग्यविधाता हरपला- पद्मश्री मिलिंद कांबळे

पुणे दि– बजाज ऑटो कंपनी स्थापन झाली आणि मराठवाड्यातील अनेक तरुणांना या कंपनीने भुरळ घातली 1983 ते 1987 या काळात मी नांदेड येथे शासकीय तंत्रनिकेतन मध्ये इंजनियारींग मध्ये शिक्षण घेत होतो .आमचे अनेक सहकारी जे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजनिरिंग ला शिकत होते त्यापैकी बरेच जण औरंगाबादला बजाज कंपनीत नोकरी मिळवून स्थायिक झाले . मराठवाड्यातील अनेक विविध जिल्ह्यातून अनेक तरुण औरंगाबाद ला स्थलांतरित झाले . औंगाबाद चा चेहरा मोहरा बदलून गेला .
‘ बुलंद भारत की बुलंद तस्वीर ,हमारा बजाज ‘ ही जिंगल तरुणांना स्वप्न दाखवत राहिली आपल्याजवळ बजाज स्कूटर असावीच असं प्रत्येकाला वाटतं होते . उद्योगा बरोबरच सामाजिक भान जपणारा देशाचा आणि मराठवाड्याचा भाग्यविधाता आज काळाच्या पडद्याआड गेला .
गेल्या 10 वर्षात अनेकदा त्यांना भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा योग आला. दलीत तरुणांना आणि उद्योजकांना त्यांनी दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या माध्यमातून खूप मोलाची मदत आणि सहकार्य केले आहे .आमच्या संस्थेचे अनेक सभासद बजाजचे टियर 2 व्हेंडर होते.हे आमच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
डीक्की परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
पद्मश्री मिलिंद कांबळे
संस्थापक दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डीक्की )

496 Views
बातमी शेअर करा