KINWATTODAYSNEWS

सर सेनापती नेताजी पालकर याच्यावरील माहितीपट म्हणजे ऐतिहासिक ठेवा: डी.पी.सावंत

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.10.महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांचा प्रती शिवाजी असा गौरवाने उल्लेख केला जातो, अशा पराक्रमी,शूरवीर,लढवय्या योद्धयावरील माहिती पट म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.पी.सावंत साहेब यांनी केले.ते प्रतिशिवाजी म्हणून गणले जाणारे सरसेनापती नेताजी पालकर यांच्यावर बनविण्यात आलेल्या डॉक्युमेंटरी विमोचन प्रसंगी बोलत होते.

नेताजीराव पालकर यांची शौर्यागाथा सांगणारा डॉ रेखा चव्हाण निर्मित माहिती पटाचे विमोचन माजी शिक्षण मंत्री मा डी.पी.सावंत साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण,कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलिकर,जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी आंबूलगेकर महापौर सौ. जयश्रीताई पावडे,मा जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर,मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सचिव प्राचार्य पंजाबराव चव्हाण,मराठा सेवा संघ नांदेड जिल्हाध्यक्ष उद्धव पाटील सूर्यवंशी नानाराव कल्याणकर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी संचालक अविनाश पाटील कदम शहर जिल्हा काँग्रेसचे डॉक्टर विठ्ठल पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रा.संतोष देवराये यांनी नेताजी पालकर यांच्या विषयीचा इतिहास सांगितला.या माहितीपटाच्या निर्मात्या डॉ रेखा पाटील चव्हाण यांनी माहितीपटा मागील पार्श्वभूमी विशद केली.

यावेळी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष हरजिंदरसिंग संधू ,मंजुषा शाम पाटील, सीताराम पाटील (सरपंच फळी) महेश पाटील,वसंत जाधव , ज्ञानेश्वर डोंगरे,गंगाधर पाटील व कॉंग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

289 Views
बातमी शेअर करा