*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१०.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या दुसऱ्या जिन्याची पायाभरणी गुरुवार दि. १० फेब्रुवारी रोजी तत्कालीन महापौर मोहिनी येवनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. दुसऱ्या जिन्याचे काम लवकरच पूर्ण होईल यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची गैरसोय होणार नसल्याचे सौ मोहिनी येवनकर यांनी सांगितले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सध्या एक जिना आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हाभरातील भीमसैनिक,अनुयायी मोठ्यासंख्येने अभिवादन करण्यासाठी येतात. एक जिना असल्याने अनुयायांची गैरसोय होते यासाठी आणखी एका जिन्याचे बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली होती.
तत्कालीन महापौर मोहिनी येवनकर व सुरेश हाटकर यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांच्या कार्यकाळातच आ.मोहन हंबर्डे यांनी दुसऱ्या जिन्याचे बांधकाम करण्यासाठी आमदार निधी दिला.त्याच निधीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या दुसऱ्या जिन्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.दुसऱ्या जिन्याची पायऱ्या भरणी गुरुवारी तत्कालीन महापौर मोहिनी येवनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. या कामाची पाहणी आ.मोहन हंबर्डे,स्थायी समिती सभापती किशोर स्वामी,काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, निलेश पावडे,संदीप सोनकांबळे,विठ्ठल पाटील डक,जी.नागय्या,सुरेश हटकर,आयुक्त डॉ.सुनील लहाने, गिरीश कदम,दयानंद वाघमारे,दीपक पाटील,दुष्यन्त सोनाळे आदींनी केली आहे.