किनवट (प्रतिनिधी ) . .किनवट तालुक्यातील मौजे अंबाडी येथील प्राचीन हेमाडपंथी श्री बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू झाले असून कामासाठी अपेक्षित असलेल्या निधीसाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन हेमाडपंथी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे
मौजे अंबाडी येथे अतिप्राचीन हेमाडपंथी श्री बालाजी मंदिर आहे कालानुरूप मंदिराच्या पाठीमागील भागाची पडझड झाली असून त्यांचे जीर्णोद्धार किंवा दुरुस्ती करण्याचे मंदिर संस्थानने ठरवले आहे. त्यानुसार मंदिराचे प्राचीन स्ट्रक्चर जशास तशे ठेवण्यात येणार आहे सध्या मंदिर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पुढील कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी परिसरातील भाविक भक्तांनी जिर्णोद्धाराच्या कामासाठी ज्या प्रकारे शक्य असेल त्यानुसार सढळ हाताने मदत करावी, साहित्य रुपी मदत किंवा आर्थिक द्यावी असे आवाहन हेमाडपंथी श्री बालाजी मंदिर संस्थानचचे सुभाष चव्हाण , मोबा. 9657527375 कैलास सिलमवार, मोबा. 9021506819 कैलास जाधव, मोबा. 8308013440 यांनी केले आहे
किनवट तालुक्यातील मौजे अंबाडी येथील प्राचीन हेमाडपंथी श्री बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू ;निधीसाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन
519 Views