*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.10.महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या कुशल नेतृत्वाने येत्या काळात नांदेड शहराचा भरपूर विकास होणार आहे. ना. अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी साडे सहा हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.व नांदेड दक्षिण चे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या मतदार संघात सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे.व येत्या काळात सिडको हडको भागातील उर्वरित विकास कामे झपाट्याने होतील अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र विधानपरिषद प्रतोद आ.अमर राजूरकर यांनी. आज दि.8 फेब्रू. सोमवारी एस.बी.आय.बँक जवळ जिजामाता कॉलनी सिडको नाविन नांदेड येथे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक (19 अ.) सिडको भागात मूलभूत सोई सुविधा अंतर्गत 75 लक्ष रुपयाच्या सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतोद आ.अमर राजूरकर व नांदेड दक्षिणचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते आज करण्यात आले त्याप्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते.
या वेळी नांदेड दक्षिण मतदार संघाचे आ.मोहन अण्णा हंबर्डे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माननीय नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांनी संकटकाळात नांदेड जिल्ह्याच्या व शहराच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात भरीव निधी उपलब्ध करुन दिला.व सिडको-हडको भागाचा उर्वरित विकास या पुढे झपाट्याने करायचा आहे त्यासाठी माननीय नामदार अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतदान देऊन विजयी करायचे आहे असे आवाहन त्यांनी केले कारण की मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वश्रेष्ठ नेते म्हणुन ना.अशोकराव चव्हाण साहेब यांच्या कडे पाहिले जाते.
संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा येत्या काळात नक्कीच सर्वांगीण विकास होईल व नांदेडच्या सौंदर्यात भर पडेल असा मला विश्वास आहे असे प्रतिपादन आ. मोहनराव हंबर्डे यांनी यावेळी केले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड यांनी केले.यावेळी व्यासपीठावर नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष प्रवक्ते सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक संतोष पांडागळे,जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, माजी नगरसेविका प्रा. डॉ. ललिता शिंदे बोकारे,नगरसेवक राजू पाटील काळे,राजू गोरे, उदय देशमुख,संजय इंगेवाड,श्याम जाधव नांदेड तालुका अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शेख असलम,संतोष मोरे, संभाजी जाधव,भि.ना. गायकवाड,संतोष कवाडे,यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. अशोक कलंत्री,नारायण कोलंबी कर प्रल्हाद गव्हाणे,विश्वनाथ शिंदे,देविदास कदम प्रा.मुकुंद बोकारे,राजु लांडगे,वैजनाथ माने,भुजंग स्वामी,संदिप गायकवाड,के.एल.ढाकणीकर, नूर मामु,सौ.विमलाबाई चित्ते, सौ. देबडवार,शशिकांत हाटकर, प्रीतम लिंबेकर,मुजाहिद पठाण विजय करडे,दिलीप लांडगे, जगदीश भुरे,यांच्यासह जिजामाता कॉलनी येथील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन पत्रकार डि.गा. पाटील यांनी केले.