*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.9. जिल्यातील हदगाव तालुक्यामधील वाटेगाव ते फळी रस्त्यावर असलेले पादन रस्त्यावरील पुलाचे काम शेतक-यांना येण्याजाण्यासाठी आ.माधवराव यांच्या पाटील जवळगावकर माध्यमातून करून देईल असे आश्वासन डॉ . रेखाताई चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केले असून त्या हदगाव तालुक्यातील फळी या गावाला भेट देण्यासाठी आलेल्या होत्या.प्रदेश महिला कांग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा डॉ . रेखाताई पाटील चव्हाण यांनी फळी गावाला भेट दिली तेव्हा गावातील ग्रामपंचायत वतीने फळी गावचे सरपंच सीताराम पाटील कदम यांच्याशी एक तास चर्चा करून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठवू असे आश्वासन दिले.
त्यावेळी नागेश सावतकर,चंद्रकांत कदम, पांडुरंग कदम,अमोल कदम,पंजाबराव कदम,प्रकाश कदम,दादाराव कदम नाथराव कदम, शेषेराव कदम,पंडितराव कदम,गंगाधर कदम,सह यावेळी दगडवाडी येथील सरपंच वैजनाथ पाटील,वानखडे सीताराम कदम ग्रामसेक शिवाजीराव कदम,उपसरपंच गजानन कदम,सतिश खानसोळे,गावचे पोलीस पाटील संतोष कदम काशीनाथ कदम,उत्तमराव कदम,गणेश कदम यांची पण उपस्थितीती होती तसेच रेखाताई हदगावला कधी येणार त्यासाठी वाटेगाव येथील काही ज्येष्ठ मंडळी वाट पाहत उपस्थित होती कारण त्यांचा ही पुलाचा प्रश्न अनेक वर्षापासून चालु आहे. हादगाव मार्ग वाटेगाव ते हिमायतनगर अतिशय जवळचा मार्ग आहे.
वाटेगाव ते कारखेड मध्ये एक नदी असून त्या नदीवर चे पुलाचे काम लवकरात लवकर करू अशा गाव्ही यावेळेस देण्यात आली. परंतु काम सुरू होणार असल्यामुळे गावकऱ्यांनी आभार वक्त केला आहे. आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करत असताना संबधीत विषयावर चर्चा करत होते