श्रीक्ष्रेत्र माहूर/वि.प्र.पदमा गि-हे
कॉँग्रेस नेते,संसदरत्न दिवंगत खा.राजीव सातव यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी झळकताच माहूर तालुक्यावर शोककळा पसरली.शिवसेना,भाजपा,कॉँग्रेस,रा.कॉ.आदि पक्षासह विविध सामाजिक व पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
सर्वसामान्यांच्या हितासाठी खा.राजीव सातव यांनी कायम लढा दिला, कधीही जातीच्या बंधनात ते अडकले नाहीत,त्यांनी कधीही पक्ष भेद पाळला नाही,त्यांच्या अकाली जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून निघणार नाही अशी भावना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांनी व्यक्त केली. एका असामान्य नेतृत्वाला मुकलो असून मराठवाड्याची अपरिमित हाणी झाल्याची खंत भाजपाचे युवा नेते अॅड.रमण जायभाये यांनी व्यक्त केली.खा.राजीव सातव यांनी अगदी कमी वयात हिमालय सर केला, सर्वसमावेशक राजकारण हे त्यांचे खास वैशिष्ट्य त्यांच्या अकाली जाण्याने मराठवाड्यासह कॉँग्रेस पक्षाचे फार मोठे नुकसान झाल्याची व्यथा डॉ.निरंजन केशवे यांनी मांडली.स्व.विलासराव देशमुख,स्व.गोपीनाथराव मुंडे व स्व.खा.राजीव सातव यांचे रूपात तिन हीरे गमावल्याने आपण पोरके झालो असल्याचे मत सुनील बेहेरे यांनी मांडले.
द पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले,माजी सभापती वसंत कपाटे,किशन राठोड,सुरेश गी-हे,निरधारी जाधव,वंजारी समाज संघटनेचे राजू दराडे, आदिवासी नेते संजय पेंदोर,रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त संजय काण्णव,अनिल वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार अपील बेलखोडे,कार्तिक बेहेरे,राम दातीर,पवन कोंडे, शेतकरी नेते अविनाश टनमने,जयंत गी-हे, प्रशांत शिंदे, झामरे,मांडवकर आदिंनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.