किनवट( प्रतिनिधी)आपल्या गायन कौशल्याने संपूर्ण जगाला मोहीत करणार्या गानकोकिळा भारतरत्न लता दीदींच्या दू:खद निधनाची बातमी कानी पडताच मनाला अतिशय दुःख झाले असून त्यांच्या जाण्याने गायन क्षेत्राची कधी न भरून निघणारी हानी झाली.लताजींनी आपल्या मधूर वाणीतून गायलेले ऐ मेरे वतनके लोगो ,मेरे देशकी धरती सोना उगले हिरे मोती हे गाणे कानी पडताच प्रत्येक नागरिकामध्ये । देशभक्ती जाग्रुत झाल्याशिवाय राहत नाही लतादिदींचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान असून लतामंगेशकर, रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रुग्णांनवर। उपचार केले जात असून। स्वर्गीय लतादीदींना जन्मताच सरस्वतीमातेने कोकीळेच्या कंठाप्रमाणे मधूर वाणीतून गायनाचे वरदान दिले होते एकंदरीत लतादिदींचे जाण्याने गायन क्षेत्रात पोफळी निर्माण झाली असल्याची खंत व्यक्त करत देशाची लेक लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
गानकोकिळा लतादिदीच्या निधनाने गायन क्षेत्राचे नुकसान कधीही भरून निघणार नाही. -आमदार भीमराव केराम.
479 Views