डेरला तालुका लोहा.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरला येथे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गुलाब शिंदे या युवा नेतृत्वाचा वाढदिवसा निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व खाऊचे वाटप करण्यात आले.
4 फेब्रुवारी रोजी गावचे सरपंच विठ्ठल सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी उपसरपंच उमाकांत शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे माजी सरपंच बालाजी शिंदे .शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार शिंदे शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष रामा पाटील डाकोरे .सदस्य वैजनाथ कदम .नामदेव कदम. खंडोजी राजेगोरे .आनंद शिंदे संतोष शिंदे सौ मनीषा कदम. सौ जिजाबाई दूध कावडे. शंकर कदम .आदी मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शाळेतील सौ मनिषा पवार सौ ज्योती हंबर्डे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन उत्तम शिरसागर तर आभार दत्तात्रय पांचाळ यांनी मानले।