*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.4. जिल्यातील हदगाव तालुक्यात पिंपरखेड येथील बिअरबार मध्ये जेवणाची सर्व्हिस बरोबर नाही तसेच राईस (भात) बरोबर दिला नाही म्हणून एकाचे दोन दात पाडून गंभीर दुखापत व आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरखेड येथील गजानन बार अँड रेस्टॉरंटमध्ये 1 फेब्रुवारी रोजी 7 ते 9.30 च्या दरम्यान कांही जण बसले असता त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली व जेवणानंतर सर्व्हिस बरोबर नसल्याच्या कारणावरून व राईस(भात)बरोबर दिला नाही म्हणून बारमधील अनिल वाकोडे यास शिवीगाळ केली.
तसेच आरोपींनी आपल्या साथीदारास बोलावून बारमधील दारूच्या बाटल्या फोडत आर्थिक नुकसान केले.व अनिल वाकोडे यास लाकडाने गंभीर मारहाण करून दोन दात पाडले व जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी अनिल गणपतराव वाकोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनाठा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुरुन 18/2022 भादवी कायद्याप्रमाणे 326,324,427,323,504,506,34 कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चव्हाण हे करीत आहेत.