किनवट (तालुका प्रतिनिधी) दि ०४* अफाट मेहनत,जिद्द व आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत अजय टारपे या विद्यार्थ्यांने पहिल्याच प्रयत्नात सरकारी कोट्या मधून एमबीबीएस प्रवेशास पात्र ठरत आई-वडिलांचे व आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केल्यामुळे त्याचे परिसरात अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
बोधडी (बुद्रुक) येथील त्याचे वडील सुरेश टारपे हे गेल्या दहा वर्षापासून राष्ट्रवादीचे भटक्या विमुक्त जाती जमातीचे तालुका अध्यक्ष गजानन पाटील मुंडे यांच्या कडे सालदार म्हणून काम करत आहेत. अजयची बौद्धिक क्षमता पाहून गजानन मुंढे यांनी त्यास शिक्षणासाठी भरीव मदत करीत त्यास प्रोत्साहन दिले. आई-वडिलांच्या गरिबीची जाण असलेल्या अजयने अहोरात्र परिश्रम घेत अभ्यास केला आणि 2021 मध्ये झालेल्या नीट परीक्षेत त्यांने 390 मार्क मिळवित यश संपादन केले. आणि आपला सरकारी मेडिकल कॉलेज ला प्रवेश मिळविण्याचा मार्ग मोकळा केला. या निमित्ताने “प्रयत्न करता वाळूचे कण रगडीता तेलही गळे” या ओळींची प्रचिती येते. या यशाचे श्रेय तो आपले आई वडील व त्यात शिक्षणासाठी प्रोत्साहन देत मदत करणारे गजू पाटील मुंडे यांना देतो. पुढे एक यशस्वी, गुणवंत डॉक्टर होऊन गोरगरीब, आदिवासी जनतेची आरोग्य सेवा करण्याचा मानस अजयने बोलून दाखवला.
सालदार वडिलांचा मुलगा अजय बननार एमबीबीएस..! पहिल्याच प्रयत्नात केले आई वडिलांचे स्वप्न साकार
353 Views