KINWATTODAYSNEWS

रेशनचा गहू व तांदूळ काळ्याबाजारात जाणारे दोन आयचर टेम्पोसह २९० पोते एलसीबी पथकाने पकडले

नरसी ( प्रतिनिधी ) 

       रामतिर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नरसी शहरात असलेल्या दत्तकृपा ट्रेडिंग कंपनी मधून रेशनचा ( शासनाचा) गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्री साठी नेण्याच्या उद्देशाने दोन आयचर टेम्पोत भरत असताना नांदेड येथील एलसीबीच्या पथकाने अचानक  धाड टाकून गहू व तांदळसह दोन आयचर टेम्पो पकडून जवळपास ५० किलो वजनाचे २९० पोते दोन अयचर टोप्पो रामतीर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले असून यासंबंधी नायगाव तहसील कडे पत्र देऊन कळविण्यात आले आहे.  शासनाचे गहू व तांदूळ खरेदी करणा-या व्यापा-यावर कोणती कारवाई होणार ? की !!”शाॅम्पल शासनाचे नाही” म्हणून सोडून देण्यात येणार !! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 कोरोणाची सुरूवात होऊन दिड वर्ष होत आले आहे.कोरोणा मुळे सरकारला  लाॅकडाऊन करावे लागले होते .त्यामुळे गोरगरीब जनतेच्या हाताला  काम मिळाले नाही त्यामुळे जनतेसाठी  नेहमी मिळणारे राॅशन तर सुरूच होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर महा मोफत धान्य देत आहे त्यामुळे जनतेला धान्य ही भरपुर मिळत आहे पण नरसीत पकडलेले धान्य कुटून आले हे मात्र चोकशी नंतरच उघडकीस येईल असे असले तरी नांदेड वरून दररोज बरीच वाहणे राॅशनचे धान्य भरून नरसी मार्ग हैद्राबाद कडे जात असल्याची चर्चा होत आहे.

             नांदेड – देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या नरसी  येथील दत्तकृपा ट्रेडिंग कंपनी मध्ये गेल्या कित्येक दिवसापासून शासनाकडून गरिबांना दिले जाणारे गहू व तांदूळ विकल्या जात असल्याची गोपनीय माहिती एलसीबी च्या पथकाला मिळाली असता दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास नांदेड येथील एलसीबी पथकातील सपोनि द्वारकादास चिखलीकर, जैस्वतसिंग शाहु, हणमंत पोतदार, बालाजी यादगिरवाड, हेमंत बिचकेवाड यांनी नरसी येथे टाकलेल्या धाडीत भरदिवसा अयचर टेम्पो क्र. एम एच २६बी.ई ६८०६ व अयचर टेंपो क्र. एम‌.एच २६ ए.डी.२०८२ या दोन्ही टेम्पोत पन्नास किलोचे १४० पोते गहू व १५० पोते तांदूळ असे एकुण २९० दोन्ही टेम्पोमध्ये काळा बाजारात घेऊन जाण्याच्या उद्देशाने भरत असताना मिळून आला असल्याने सदरील दोन्ही टेम्पो मुद्देमालासह रामतीर्थ पोलिसांच्या ताब्यात देऊन सदरील मााल हा शासनाचा आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी नायगाव येथील तहसील कार्यालययांना पत्र देऊन कळविणत आले असल्याने या ट्रेडिंग कंपनी चालकाविरुद्ध कोणती कारवाई होणार ? की, “शंंम्पल शासनाचे” नाही म्हणून सोडून देण्यात येणार!! याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

      एकीकडे शासनाकडून गरिबांना अल्प किमतीत व मोफत गहू व तांदूळ मोठ्या प्रमाणात दिले जात असताना “कित्येक नागरिक हे शासनाकडून दिले जाणारे गहू व तांदूळ घरी न खाता खुलेआम बाजारात विकली जात असल्याचे दिसून येत” असताना अशा सामान्य गरीब कुटुंबाकडून अल्प किमतीत शासनाचा गहू व तांदूळ खरेदी करून मोठ्या व्यापाऱ्याकडून काळा बाजारात विकल्या जात असताना प्रशासनाकडून याकडे मात्र “सोयिस्कर”
किवा “अर्थपूर्ण”दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

        

661 Views
बातमी शेअर करा