किनवट/प्रतिनिधी:
मांडवा( कि) ता. किनवट जिल्हा नांदेड येथील आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी गैरहजर राहत असल्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी किनवट यांना कृष्णकमळ चिनय्या नडकुंटीवार रा.मांडवा( की) ता.किनवट यांनी निवेदन सादर केले आहे.
यात मांडवा येथील आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नेमणूक पदावर पाच असून एकही कर्मचारी मांडवा येथील मुख्यालयात राहत नसल्यामुळे गावातील लोकांच्या आरोग्याबाबत प्रचंड गैरसोय होत आहे.
संपूर्ण देशात व जगात कोरोना सारख्या महाभयंकर महामारी चालू असून महामारी मुळे आज पर्यंत अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहे. अशातच काल -परवा मांडवा (कि) येथील एका दीड वर्षाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या बालकाचा मृत्यू कशामुळे झालेला आहे हे अद्याप माहीत झालेला नाही. जर गावातील मुख्यालयात आरोग्य कर्मचारी राहिले असते तर सदरील बालकाचा मृत्यू झाले नसते मांडवा की येथील आरोग्य कर्मचारी 1 डॉक्टर 2 ए.एन. एम. 1 एमपीडब्ल्यू असे शासनाने नेमून दिलेले आरोग्य कर्मचारी असून यातील एकही कर्मचारी मुख्यालयात राहत नाही.
जर येत्या दहा दिवसात च्या आत वरील सर्व आरोग्य कर्मचारी मांडवा (कि) येथील मुख्यालयात हजर न राहिल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
सदरील निवेदनाच्या प्रती राजेश टोपे आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, तालुका आरोग्य अधिकारी किनवट यांना देऊन कळविण्यात आले आहे.
मांडवा (कि) ता. किनवट येथील आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर.
654 Views