किनवट प्रतिनिधी:
किनवट,माहूर या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यांमध्ये सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे-पाटील यांना अतिशय भावनिक असे आज दिनांक 28 रोजी निवेदन पाठवून तालुक्यातील बेकायदेशीर व्यापार बंद करण्याची मागणी केली असून या निवेदनाची दखल शासन आणि पोलीस विभागा कडून घेतल्या गेली नाही तर प्रसंगी उपोषण करण्याचा गंभीर इशारा आमदार भीमराव केराम यांनी दिला आहे.
राज्याचे गृहमंत्री यांना आमदार भीमराव केराम यांच्याकरवी पाठविण्यात आलेल्या निवेदनात नांदेड जिल्ह्यातील किनवट हा मतदार संघ आदिवासी प्रवण क्षेत्र असून अतिशय मागासलेला आहे. आदिवासियां सोबतच बंजारा व इतर मागास समाजाचे अल्पभुधारक शेतकरी तसेच बहुसंख्य मजुरी वर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणारे कुटुंब आहेत.कुठलीच रोजगाराची सुविधा सुध्दा नाहीत. अशात गेल्या वर्षभरापासून किनवट माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध मटका,जुगार, गुटखा व गावठी दारू व्यवसाय शहरासह ग्रामीण भागातील चौका चौकात जे वर्दळीचे ठिकाण आहेत.अशा ठिकाणी हा व्यवसाय राजरोसपणे सुरु आहे.त्यामुळे अनेक शेतकरी,शेतमजुर सुशिक्षीत बेरोजगार युवा पिढीदेखील व्यसनाधीन झालेली असून अनेक कुटुबे उध्दवस्त होत आहेत.दरम्यान आमदार केराम दरम्यान आमदार कॅरम यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते हिवाळी अधिवेशनाला हजर राहू शकले नाही अन्यथा हा विषय विधिमंडळाच्या पटलावर तारांकित प्रश्नच्या रूपाने उपस्थित झाला. सध्या स्थिती मध्ये दिवसेंदिवस बेकायदेशीर व शासनाचा प्रतिबंध असलेले अवैध धंदे पूर्ण मतदार संघात खुलेआम सुरु असल्याने पोलीसांची तर भीतीच नाही.उलट पोलीस विभागाचीच या सर्व अवैध धंदयांना मुक संमती आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे.त्यामुळे सर्व सामान्य जनतेकडून अवैध धंदे बंद करण्याची मागणी वारंवार होत आहे.सदरील अवैद्य व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने येथील मजुरी करणारा गरीब आदिवासी व मजुर वर्ग शेतकरी,कामगार व सुशिक्षीत तरुण यात बळी ठरून मृत्यूला कवटाळत आहे.त्यामुळे अनेक तरुणांचे बळी गेल्याने अल्प वयातच स्त्री विधवाचे प्रमाण वाढले असून त्यांची परिस्थिती दयनिय व भयावह झालेली आहे. अशा प्रकृती कारणामुळे पुन्हा पुन्हा आपल्याकडे पाठपुरावा करण्यास मी प्रत्यक्ष येवू शकत नसल्याने मतदार संघातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून, आपण सदरील अवैध धंदे बंद करण्यासाठी संबधीतांना तातडीने आदेश द्यावेत,अशी आग्रही विनंती आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना केली आहे.