KINWATTODAYSNEWS

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या संरक्षणार्थ रविवारी बैठक

नांदेड दि. 28 –
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी असतानाच, राज्य शासनाने या कायद्यावर आणखी घाव घालत अनुसूचित जाती/जमातीचे सुरक्षा कवच असलेला व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसठी आणि दलितांविरूद्धचे गुन्हे कमी व्हावे तसेच या कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक असताना, राज्य शासनाच्या गृहविभागाने हा कायदाच बोथट होण्यसाठी आता अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार उपविभागीय अधिकारी ऐवजी पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकार्‍यांना प्रदान करण्यात येत आहेत. याबाबतच्या प्रस्तावास विधी व न्याय विभागाने सहमती दर्शवली असून असे झाल्यास मागास जाती अन्यायग्रस्तांना न्याय व संरक्षण मिळण्याची शक्यता उरणारच नाही आणि हा कायदा केवळ देखावा असेल व गावोगावी मागासवर्गीय अन्यायाने भरडले जातील, अशी परिस्थिती निर्माण होईल.
अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील प्रस्तावित बदलास विरोध करत या कायद्याचे संरक्षण करणे आणि या कायद्याची कठोर अंमलबजावणीचा आग्रह धरणे आवश्यक असल्याने, याबाबत विचारविनीमय करणे आणि नांदेड जिल्ह्यात लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट संरक्षण समन्वय समितीची स्थापना करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख प्रा. रामचंद्र भरांडे, बाणाईचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. संजीवन गायकवाड, प्रजासत्ताक पार्टीचे पी.एस. गवळे, प्रा. देवीदास मनोहरे, नंदकुमार बनसोडे, जे.डी. कवडे, चर्मकार समाजाचे नेते चंद्रप्रकाश देगलूरकर, तुकाराम टोंपे, व्यंकटराव दुधंबे, राष्ट्रीय कम्युनिष्ट पार्टीचे प्रा. सदाशिव भुयारे, प्रा. इरवंत सूर्यकार, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे उत्तम बाबळे, परमेश्वर बंडेवार, भारतीय लहुजी सेनेचे रंजीत बार्‍हाळीकर, मानवहीतचे मालोजी वाघमारे, मानवी हक्क अभियानचे मच्छिंद्र गवाले, इंजि. एस.पी. राके, प्रा. आदिनाथ इंगोले, ज्येष्ठ नेते रामराव महाराज भाटेगावकर, राष्ट्रीय मातंग संघाचे भारत खडसे, कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन रविवार, दि. 30 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सहयोगनगर बौद्ध विहार, नांदेड येथे करण्यात आलेले आहे.
तरी या बैठकीला अनुसूचित जाती/जमाती समाजातील सर्व सामाजिक संघटना प्रमुख, नेते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन बैठकीचे निमंत्रक दिगंबर मोरे, सतीश कावडे, इंजि. अभिजीत बळेगावकर, यादव ढवळे, एन.जे. गायकवाड, शिवाजी नुरूंदे, पिराजी गाडेकर, पी.पी. वाघमारे, शुद्धोधन एंगडे, संदीप गजभारे, एस.डी. दामोधर, अशोक गायकवाड, विकास इंगोले, दीपक सावते, गब्बर सोनवणे, गोपाळ वाघमारे, आनंद वंजारे, माधवराव झडते, शंकरराव शिरसे, शंकर झडते, भारत मगरे, उत्तम जोंधळे, सुरेश कांबळे, मिलींद मस्के आदींनी केले आहे.

583 Views
बातमी शेअर करा