किनवट = (ता.प्र.) शहरातील महात्मा बस्वेश्वर चौकात जगतज्योती महात्मा बस्वेश्वर जयंती कोरोनाच्या संकटात सोशलटिस्टंसचे पालन करत साजरी करण्यात आली. बाराव्या शतकातील जगतज्योती महात्मा बस्वेश्वर यांची ८९० वी जयंती शहरातील म. बस्वेश्वर चौकात लिंगायत समाजाचे जेष्ठ नेते शिवराज राघु मामा यांचे हस्ते बस्वेश्वरांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन जगतज्योती बस्वेश्वरांच्या जिवन चरीत्रावर दोन शब्द सांगितले. नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी प्रतिमेचे पुजन केले. यांचेच हस्ते रामनगर येथिल दिव्यांग मुलगी कु. स्वाती राजु चौधरी हिला सेवानिवृत्त मंडळाधिकारी रमाकांत भंडारे यांंनी आपल्या निवुती वेतनातुन आई वडीलांच्या स्मरनार्थ ११०० शे. रुपयांची मद्दत करण्यात आली. यासमयी संजय बिराजदार, अरुन भंडारे, सतिष बिराजदार, चंद्रकांत भंडारे, विजय महाजन, आनंद सोनटक्के, पो.काँ. प्रकाश बोदमवाड, संजय राजने, पत्रकार अनिल भंडारे, विजय जोशी, माधव सुर्यवंशी, गणेश गटलेवार, रमेश शिंगेवाड, गजु शिवनकर इत्यादिंची उपस्थिती होती.
जगतज्योती महात्मा बस्वेश्वर यांची जयंती साजरी
136 Views