KINWATTODAYSNEWS

किनवट कोचिंग असोसिएशन तर्फे ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न. ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन दिला शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

किनवट : ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त किनवट कोचिंग असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्धघाटन डाॅ. उत्तम धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
किनवट व गोकुंदा येथील कोचिंग क्लासेस संचालक व शिक्षकांनी मिळुन हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्या बद्दल सर्व स्तरातुन सर्व कोचिंग क्लासेस संचालकांचे व शिक्षकांचे शब्दसुमनाने कौतुक होत आहे. तसेच सर्वेत्र कोरोनाची तिसरी लाट अत्यंत वेगाने पसरत असतांना देखील तब्बल ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे किनवट असोसिएशन तर्फे सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मुंडे यांनी केले तर कर्यक्रमाचे प्रस्ताविक सदाशिव जोशी यांनी मांडले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आशिष शेळके सर, झाकीर शेख सर, सदाशिव जोशी सर, विनोद मुंडे सर, मस्लोदीन शेख सर, प्रशांत माहुरकर सर, लक्ष्मन राठोड सर, दिनेश गायकवाड सर, गंगाधरे सर, पाटील सर, धिरज राठोड, विकास गेडाम, राहुल मुनेश्वर आदींनी परिश्रम घेतले.
शेवटी आशिष शेळके सरांनी आभार प्रदर्शन करतांना सर्व रक्तदात्यांचे, सर्व विद्यार्थ्यांचे, नागरीकांचे आणि सर्व कोचिंग क्लासेस संचालकांचे व शिक्षकांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

546 Views
बातमी शेअर करा