किनवट : येथील तहसील कार्यालयात विविध स्पर्धांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त किनवट तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळा महाविद्यालयांत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .
आयोजीत करण्यात आलेल्या स्पर्धामध्ये इयत्ता आठवी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही विषयी जागृती निर्माण होण्यासाठी भित्तीपत्रक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व आकाशकंदिल स्पर्धा आयोजीत करुन विदयार्थ्यामध्ये लोकशाही विषयी जागरुकता निर्माण करण्यात आली . तसेच दि . 25 जानेवारी 2022 या राष्ट्रीय मतदार दिनी विदयार्थ्याकडून संकल्पपत्र लिहून घेण्यात आले. या स्पर्धात सहभागी झालेल्या शाळा , महाविद्यालयाचे प्राचार्य व शाळेचे मुख्याध्यापक यांना सन्मानपत्र देण्यात आले. तसेच स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांंना राष्ट्रीय मतदार दिनाचे व भारतातील लोकशाहीचे महत्व सांगण्यात येऊन विदयार्थ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली . .
तहसिलदार डॉ.मृणाल जाधव व निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मो. रफीक बशीरोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखेतील पाटील एम. एस., नितीन शिदें ( म.स ) , मनोज कांबळे ( तांत्रीक सहायक ) संदीप पाटील ( स.शि ) व देवकते ( स.शि. ) स्वामी मल्लीकार्जून ( मास्टर ट्रेनर ) व तहसिल कार्यालयातील सर्व स्टॉफ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
तहसिल कार्यालय किनवट येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
83 Views