KINWATTODAYSNEWS

धम्म चळवळ गतीमान करण्यासाठी एकमनाने काम करा!-सदानंद देवके

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:धर्माबाद तालुक्या मधील धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपापसातले मतभेद, हेवेदावे विसरून एक मनाने काम करा असे प्रांजळ प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा धर्माबादचे अध्यक्ष सदानंद देवके यांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित एका बैठकीत केले.
नुकतीच भारतीय बौद्ध महासभेची धर्माबाद शाखेची नूतन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर नूतन तालुका अध्यक्ष सदानंद देवके यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर पहिली बैठक घेण्यात आली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सदानंद देवके,सचिव धडेकर गंगाधर, कोषाध्यक्ष सुभाष का़बळे,पर्यटन उपाध्यक्ष चंद्रकांत देवके,संरक्षण उपाध्यक्ष गणेश वाघमारे, पर्यटन सचिव संजय कदम,गंगाप्रसाद सोनकांबळे,संस्कार सचिव नारायण सोनटक्के, संघटक सुधाकर वाघमारे हिशोब तपासणीस माधव शेळके यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.

सदरील बैठकीत अनेक विषयावर सांगोपांग चर्चा झाली. सूचना तक्रारी व उपाय योजना याबाबत सर्वांचे एकमत झाले.यामध्ये प्रामुख्याने बौद्ध धर्मीय लग्न पद्धती मध्ये विनाकारण जो वेळ वाया जात आहे व हा लग्न विधी फक्त बावीस मिनिटांमध्ये पूर्ण करावयाचा असतो तो दोन तास कसा चालतो याबाबत पर्यटन सचिव तथा प्रसिद्धीप्रमुख पत्रकार संजय कदम यांनी पोटतिडकीने समस्या मांडत अशा लग्नामुळे इतर धर्मीय मित्रमंडळीत कसा प्रतिकूल परिणाम होत आहे याचे सोदाहरण स्पष्टीकरण दिले. व बौद्धधर्मीय लग्न पद्धत कमीत कमी वेळात कशी संपन्न करता येईल या गोष्टीकडे बौद्धाचार्यांनी लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

समता सैनिक दलाचे कशा पद्धतीने सक्षमीकरण केले जाईल या बाबीकडे समता सैनिक दलाचे संरक्षण सचिव गणेश वाघमारे यांनी पुढाकार घेऊन समता सैनिक दल सक्षम करावे असे आवाहन बौद्ध महासभेचे सचिव गंगाधर धडेकर यांनी करीत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे मुख्य पृष्ठ असलेले मासिक धम्मयान यांचे विमोचन करण्यात येऊन या माध्यमातून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी सर्वांनी वर्गणीदारही झाले.

आपल्या अध्यक्षीय समारोपात सदानंद देवके यांनी सर्वांची मनोगते ऐकून घेऊन धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यकर्ता मेळाव्यासह श्रामनेर शिबिरां पर्यंतच्या वार्षिक कार्यक्रमाची आखणी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गंगाधर धडे कर यांनी केले तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.

*चौकट* भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष माजी श्रामनेर तथा विद्यमान कोषाध्यक्ष सुभाष कांबळे यांनी धम्म चळवळी मध्ये योगदान देताना काही लोकांकडून कसा मानसिक त्रास होतो याचे स्पष्टीकरण देत अशा लोकांना वेळीच पाबंद करणे गरजेचे आहे असे आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या.

430 Views
बातमी शेअर करा