किनवट = (ता.प्र.) तालुक्यातील सारखणी येथे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सारखणी बँकेत खाली असलेले देशी दारूचे दुकान हटविण्याबाबत कायदेशीर निवेदन अर्ज देऊन सुद्धा शासनामार्फत कुठलाही पाऊल न उचल्यामुळे सारखणी येथील व परिसरातील बँकेसमोर रास्तारोको आंदोलन शिवसेनेच्या वतीने किनवट/माहुर तालुक्याच्या वतीने सर्व पदाधिकारी किनवटचे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील व माहुर तालुक्याचे तालुका प्रमुख सुदर्शनभाऊ नाईक किनवट/माहुर तालुक्याचे युवा सेनेचे युवानेते यश भाऊ खराटे सर्व पदाधिकारी उपतालुकाप्रमुख बंडू पंत चंदूलवार. उपतालुकाप्रमुख अतुल दर्शनवाड, किनवट शहरप्रमुख सुरज सातूरवार संतोष यचलवार, माहूर शहरप्रमुख निर्धारीभाऊ जाधव, माहूर उपतालुकाप्रमुख आशिष हरवळे, किनवट तालुका समन्वयक मारुती भाऊ दिवसे पाटील, मारुती सुंंकलवाड दिषा समिती सदस्य नांदेड, अविनाशभाऊ चव्हाण, दिलीप भोसले, किनवट तालुका उपसंघटक बजरंग शंकर वाडगुरे, सर्कलप्रमुख उमरी बाजार निलेश चव्हाण, उपसर्कलप्रमुख उमरी बाजार सतीश श्यामसुंदर कागणे, उपसरपंच प्रमुख मोहपुर गण उमरी सर्कल मधील सर्व शाखाप्रमुख व सर्व आजी/माजी शिवसैनिक सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येणाऱ्या 7 फेब्रुवारी रोजी सोमवारी ठिक 12 वाजता सारखणी येथे रास्तारोको आंदोलन सर्व शिवसैनिक व येथील शेतकरी नागरिकांच्या वतीने या परिसरातील सर्व शेतकरी वर्ग व सर्व शिवसेनेचे शाखाप्रमुख सर्वांनी या रास्तारोको आंदोलनास सहकार्य करावे. असे आवाहन उमरी सर्कलचे सर्कल प्रमुख बजरंग शंकर वाडगुरे यांनी केले आहे.
शिवसेनेच्यावतीने सारखणी येथे 7 फेब्रुवारीला रास्तारोको आंदोलन – बजरंग वाडगुरे
694 Views