KINWATTODAYSNEWS

अनेक धोके पत्करणा-या कॉ.गगाधर गायकवाड यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी

नांदेड : विविध विभागातील अधिकाऱ्यांना व इतरांना कायदेशीर अडचणीत आणणारे व अनेक कामगार कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे माकप चे शहर सचिव तथा सीटूचे नांदेड जिल्हा सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पोलीस महासंचालक म.रा मुंबई ,विशेष पोलीस उप महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड,जिल्हाधिकारी नांदेड,पोलीस अधिक्षक नांदेड तसेच पोलीस निरीक्षक माहूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दि.२२ जानेवारी २०२२ रोजी विनाशुल्क शस्त्रधारी पोलीस अंगरक्षकाची मागणी ई मेल द्वारे केली आहे.
सद्यस्थितीत लक्षवेधी ठरत असलेले सीटूचे आंदोलन माहूर च्या रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांचे मागील १० जानेवारी पासून अखंड सुरू आहे.
संस्थानचे विश्वस्त व सचिव सीटूच्या वतीने कायदेशीर मागण्याची पूर्तता करण्यास जाणीवपूर्वक उशीर लावत असल्यामुळे व पदाचा गैरवापर करीत असल्यामुळे अज्ञात व्यक्ती मार्फत जिवाला धोका असल्याचे कॉ.गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सन २०१० मध्ये कॉ.गंगाधर गायकवाड यांना तत्कालीन पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस संरक्षण देणे साठी कॉ.गायकवाड यांना विचारणा केली होती परंतु तेव्हा जिवाला धोका नसल्यामुळे विना शुल्क पोलीस संरक्षण कॉ.गायकवाड यांना घेणे गरजेचे वाटले नाही. परंतु माहूर देवस्थान व इतर आजवर केलेल्या आंदोलनामुळे अनेक जनांची मने दुखावल्यामुळे व अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे पोलीस संरक्षणाची अवश्यकता आहे असे त्यांना वाटत आहे.
त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे यासाठी काही कार्यकर्त्यांनी मागे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण देखील केले आहे.
दुखावलेल्या उच्च शिक्षित व्यक्तीकडून घातपात किंवा शडयंत्र रचून धोका होण्याची शक्यता बळावल्यामुळेच आपण पोलीस संरक्षणाची मागणी केली असे कॉ.गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

93 Views
बातमी शेअर करा