KINWATTODAYSNEWS

गोकुंदा येथील सिद्धार्थ नगर ,साईनगर या परिसरात नालीचे पाणी रस्त्यावर, येणे नाल्यात तुबने नाल्या वरचे झाकण फुटणे यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणीचा करावा लागतेय सामना

किनवट (शहर प्रतिनिधी) गोकुंदा येथील सिद्धार्थ नगर ,साईनगर या परिसरात नालीचे पाणी रस्त्यावर, येणे नाल्यात तुबने नाल्या वरचे झाकण फुटणे यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणीचा सामना करून आपला जीवनक्रम पार पडावे लागत आहे गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गोकुंदा लगतच्या कोठारी हद्दीत नवीन प्लॉटिंग पडल्यामुळे नैसर्गिक नाला बुजवन्यायात आला आहे. त्यामुळे नाल्याच्या पाण्याचा जाणारा प्रवाह बंद होऊन नालीचे पाणी रस्त्यावर येऊन या परिसरातील नागरिकांची ये जा बंद झाली आहे. या ज्वलंत प्रश्‍नाकडे लक्ष घालून ग्रामपंचायतीने नाल्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय गोकुंदा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोकुंदा हे विकसनशील शहर म्हणून त्यांचा विस्तार होत आहे या शहरात मोठ्या प्रमाणात वस्ती ची वाढ होत आहे त्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सुविधा मिळत नाहीत. साईनगर व सिद्धार्थनगर हा परिसर मुख्यता दलितांची वस्ती आहे. दलित विकासासाठी शासनाच्या विविध योजना येतात पण तो निधी कुठे जातो काही कळायला मार्ग नाही या ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक आहे त्यामुळे तर या परिसराचा विकास होईल अशी नागरिकांचीआशा पल्लवित झाली होती. पण त्या आकांक्षाला हरताळ्या फासून कार्यरत प्रशासक व ग्रामसेवकाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे येथे रस्त्यावरील अनेक ठिकाणी पथदिवे बंद असणे, नाल्याचे पाणी रस्त्यावर येणे, पाणी पुरवठा योजनेचा वाल मुख्य रस्त्यावर असल्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे याबाबतची कल्पना अनेक वेळा प्रशासनाला देऊन सुद्धा या बाबीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या परिसरातील नालीचे पाणी पांदण रस्त्यावर आले आहे त्यामुळे मुख्य रस्त्यावर पाण्याचे डोह साचले आहेत.वाहतूक बंद झाली आहे मार्गक्रम करता येत नाही तसेच या साचलेल्या पाण्याच्या डबक्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे त्यामुळे मलेरिया डेंगू सारखा आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ह्या समस्या तात्काळ दूर कराव्यात यासाठीचे निवेदन ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय गोकुंदा यांना देण्यात आले आहे या समस्या तात्काळ दूर कराव्यात अन्यथा रचनात्मक मार्गाने अनुदान करण्याचा इशारा सुभाष मुनेश्वर, मेघा डांगे ,मनोहर तेलंग ,संदीप कदम ,आनंद सोनटक्के ,कपिल कांबळे, मदन जाधव ,शेख चिनू ,ओमकार मोरतळे ,अमर कानिदे दशरथ शिंदे ,संतोष पाटील, दशरथ राठोड, विठ्ठल घुले ,चंद्रकांत कांबळे यांनी दिला आहे.

217 Views
बातमी शेअर करा