KINWATTODAYSNEWS

वनविभागाची अतिक्रमण हटावो मोहिम तातडीने थांबवा.. “आ. केराम यांची राज्यपालांकडे लेखी मागणी”

किनवट, प्रतिनिधी
मागील अनेक वर्षांपासून वनजमिनीवर कास्त करीत असलेल्या शेतक-यांचे वनजमिनीवरील अतिक्रमणे कायम हटवण्याच्या पार्श्वभुमिवर संबंधित शेतक-यांना कायद्याचे संरक्षण देत वनविभागाकडून होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी अशी मागणी आ. केराम यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
किनवट तालुका हा आदिवासी बहूल भाग असून येथील अनेक गोरगरीब कुटुंबिय गेल्या अनेक वर्षांपासून वनजमिनीवर कास्त करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतू या जमिनीवर कास्त करून वैय्यक्तिक वनजमिन हक्कासंबंधी दावे दाखल केलेल्या सर्व कास्तकारांचे त्यांच्या ताब्यातील वनजमिनीवरून नांदेड जिल्हा वनविभागाच्या वतीने संबंधितांचे ताबे बरखास्त करून व त्यावरून त्यांना हुसकावून लावून त्यांची अतिक्रमणे काढली जात आहेत. दरम्यान वनविभागाच्या सदर मोहिमेमुळे सामान्य नागरिक धास्तावला असून महाराष्ट्र वनजमीन अधिनियमामुळे आज ना उद्या त्यांना हक्काची जमीन मिळणार याची अपेक्षा होती. परंतू वनविभागाकडून विविध कागदपत्रे व जाचक अटी संबंधित कास्तकारांवर लादल्या जात असल्याने शेतक-यांच्या बहुतांश दावे प्रकरणात मोठ्या प्रमाणात त्रुटी काढून संबंधितांचे दावे बरखास्त करून त्यांची अतिक्रमणे काढली जात आहेत.
ही बाब म्हणजे कायद्याचे संरक्षण घेवून वनविभागाकडून संबंधित कास्तकारांवर कायदेशीर अन्यायच असल्याचा प्रकार असून वनविभागाचा हा अन्याय तातडीने थांबवणे गरजेचे आहे. करीता वनविभागाची सदरची कारवाई तातडीने थांबवून प्रलंबित वनहक्क दावे विनाविलंब निकाली काढावेत व संबंधित कास्तकारांना संरक्षण देवून वनविभागाची सदरील कारवाई तातडीन थांबवण्याचे संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशा मागणीचे लेखी निवेदन किनवट माहूर चे आमदार भिमरावजी केराम यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे….

366 Views
बातमी शेअर करा