किनवट ता प्र दि 19 माहूर नगर पंचायत येथील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती आल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्यायास आला आहे त्यामुळे किनवट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरातील जिजामाता चौक येथे फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. व यावेळी पेढे देखील वाटण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ता अध्यक्ष प्रकाश राठोड, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील, प्रवीण म्याकलवार, वैजनाथ करपुडे पाटील, प्रवीण राठोड, हसन लाला, शेख अफरोज, युवा नेते बालाजी बामणे, राहुल नाईक, नाना भालेराव, चव्हाण सर, डॉ रोहिदास जाधव, सरपंच गोविंद, पृथ्वीराज आडे, भिसे, अमोल जाधव, गुलाब जाधव, प्रेमसिंग जाधव , विनायक गव्हाणे यांनी उपस्थिति होती.
निवडून आलेले उमेदवार,पक्ष व मते-
विलास बाजीराव भंडारे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -307) आशाबाई निर्धारित जाधव (शिवसेना -219),नंदा रमेश कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -125 )विजय शामराव कामटकर (शिवसेना -138) सारिका देविदास सिडाम,(रा कॉ -153) सौदागर मसरात फातेमा अब्दुल रफिक (राष्ट्रवादी काँग्रेस-19),केशव राजेंद्र नामदेवराव ₹भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-234),सौदलकर कविता राजू (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-163),सय्यद शकीलाबी शब्बीर (राष्ट्रवादी काँग्रेस-166),शेख लतीफा मस्तान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-212 )लाड ज्ञानेश्वर नारायण (शिवसेना -194), राठोड सागर विक्रम (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -169) महामने सागर सुधीर (भाजप -341), शेख बिल्किस बेगम अहमद आली (राष्ट्रवादी काँग्रेस118), दोसानी फिरोज कादर (राष्ट्रवादी काँग्रेस285), खडसे अशोक कचरू (राष्ट्रवादी काँग्रेस 99), पाटील शीला रणधीर( राष्ट्रवादी काँग्रेस128)
पक्षीय बलाबल-
(1)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -6 (2)राष्ट्रवादी काँग्रेस-7 (3)शिवसेना-3 (4)भाजपा- 1 एकुण-17
माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादी 7, काँग्रेस 6, शिवसेना 3 तर भाजपला केवळ 1 जागा
923 Views