KINWATTODAYSNEWS

वासी/ उस्मानाबाद : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या समाजसुधारक प्रबोधनकारांच्या यादीत साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंना डावलून त्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरणारा फाऊंडेशनचा संचालक विकास त्रिवेदी याला तात्काळ निलंबित करावे व महाराष्ट्रभर मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लहुजी शक्ति सेनेच्या वतिने मा.नरसिंग जाधव तहसीलदार साहेब तहसील कार्यालय वाशी यांना निवेदन देण्यात आले. या मध्ये खलील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

*प्रमुख मागण्या*
*१)* *केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशचा बिनडोक संचालक विकास त्रिवेदी याच्यावर कायदेशिर कार्यवाई करून त्याचे निलंबन करावे तसेच साहित्यभुषण आण्णाभाऊ साठे व आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, क्रांतीवीर फकीरा रानोजी यांची नावे समाजसुधारक प्रबोधनकारांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावीत.*
*२)* *अमरावती प्रशासनाने हटवलेले छत्रपती शिवाजी महाराज व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे याचा पुतळा तात्काळ बसवावा.*
*३)* *यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील वैदयकीय अधिकारी डॉ हनुमंत धर्मकारे यांच्या खुनाचा तपास वेगाने करून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी.*
*४)* *अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मोजे राजापूरमाट येथील जातीवादी वीटभट्टी मालक विकास घेगळे यांच्या खोट्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस निरीक्षक व बिट अमंलदार खेडकर यांनी मातंग समाजाच्या दोन तरूणावर खोटे गुन्हे दाखल करून जबर मारहान केलीली आहे व खंडणी मागितलेली आहे तरी, संबधित विटभट्टी मालक व बेलवंडी पोलीस निरीक्षक तसेच संबधित बिट अमंलदार खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून मातंग तरूणावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत.*

वरील मागण्यांचा शासनाने तात्काळ विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन राज्यभर करण्यात येईल असा इशारा लहुजी शक्ती सेनेकडून देण्यात आला.
यावेळी,
लहुजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मारुती भाऊ क्षिरसागर, जिल्हा संघटक हरिभाऊ क्षिरसागर, तालुका अध्यक्ष अमोल भाऊ क्षिरसागर, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष विकास भाऊ क्षिरसागर, तालुका संघटक किशोर भाऊ गवारे, युवक तालुका अध्यक्ष अजय भाऊ बाबर,महिला तालुका अध्यक्ष ज्योती ताई आडागळे,तालुका सर्कलप्रमुक लखन भाऊ शिंदे,तालुका सचिव दिपक भाऊ क्षिरसागर, तालुका कार्याध्यक्ष अमोल भाऊ गायकवाड, महिला तालुका उपाध्यक्ष दीपाली ताई सोनवणे,वाशी शहर कमलेश भाऊ क्षिरसागर, युवक शहर आदेश भाऊ शिंदे,वाशी शाखा अध्यक्ष विशाल भाऊ आडागळे व लहुसैनिक आदी उपस्थित होते.

403 Views
बातमी शेअर करा