KINWATTODAYSNEWS

शिष्यवृत्ती परीक्षेत पालाईगुडा शाळेचे घवघवीत यश विद्यार्थ्यांनी राखली यशाची परंपरा परिसरात होत आहे विद्यार्थ्यांचे कौतुक

सचिन जाधव दैनिक सायरन सारखणी दि.17/01/2022

येथून जवळच असलेल्या पालाईगुडा तालुका माहूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालाईगुडा तालुका माहूर शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवून यावर्षी सुद्धा सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक करण्यात यश मिळाले आहे त्यात विद्यार्थी ओम चंदन पवार 262 गुणासह जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांक पटकविला आहे आणि अक्षरा सुधाकर पवार 260 गुणासह जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर पटकविला आहे तसेच प्रगती प्रेम राठोड गायत्री पंढरीनाथ कवळे अक्षरा प्रदीप राठोड नमन अजय पवार अंकित विलास बावणे हे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्ती धारक आलेले आहे

विद्यार्थ्यांच्या यशा त्यांच्या पालकांचं व वर्गशिक्षक एस.जी.कुडे मुख्याध्यापक व्ही.के.पिसलवार यांच्या मोलाचा सहभाग आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून पी.टी जाधव एस. एस.आर.घवळे व्ही.के.भिसे एम.एस. घुसडवार आर. आर.मेश्राम तसेच गावातील पुंडलिक राठोड विकू पाटील गणेश राठोड आदींचे गावातील मंडळी त्यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे

592 Views
बातमी शेअर करा