KINWATTODAYSNEWS

गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटर चालू करा – माजी आमदार प्रदीप नाईक ; राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना दिले निवेदन

किनवट ता प्र दि 13 गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटर चालू करा अशा आशयाचे निवेदन माजी आमदार प्रदीप नाईक यांनी राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांना आज दिले आहे.
किनवट हा मराठवाड्यातील एकमेव आदिवासी तालुका असून तो अत्यंत दुर्गम भागात आहे तर येथे दळणवळनाचे अत्यल्प संसाधने उपलब्ध आहेत त्यामुळे किनवट येथे डायलेसिस ची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना नांदेड सारख्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. तर नांदेड येथे जाण्यासाठी वाहतूकीची कमी साधने आहेत एक ते दोन रेल्वे आहेत तर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुमारे 5 वर्षा पासून प्रलंबित आहे आहे अशा स्थितीत रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांची होत असलेली हेळसांड पाहता माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गोकुंदा येथे ही सुविधा उपलब्ध व्हावी या करिता पाठपुरावा केला आहे तर त्यास मंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले आहे , सदर निवेदन नांदेड च्या गुरू गोविंद सिंग रुग्णालयाचे संचालक डॉ रोहिदास जाधव यांनी मुंबई येथे सादर केले आहे.

348 Views
बातमी शेअर करा