किनवट/प्रतिनिधी:
किनवट येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच सामाजिक चळवळीमध्ये मोलाचे योगदान असलेले डॉक्टर यु.बी.मोरे यांचे आज दि.18-01-2022 रोजी पहाटे 5:30 वाजता हृदविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 2:00 वा. होणार आहे.
डॉक्टर मोरे हे ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे प्रदीर्घ काळ सेवा करून निवृत्त झाले होते. त्यांनी किनवट मध्ये मोरे हॉस्पिटल नावाने मोठे रुग्णालय स्थापन करून किनवट वासियांची आज पर्यंत सेवा करत होते. सामाजिक कार्यामध्ये ही ते सक्रिय राहत असतात. सुपरिचित असलेले डॉक्टर मोरे यांच्या अचानक जाण्याने किनवट तालुक्यात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना -संपादक किनवट टुडे न्युज
1,891 Views