KINWATTODAYSNEWS

मांडवी येथे अवैध धंदे विरुद्ध धडक कारवाई

मांडवी : दी.13/01/022 रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग नांदेड यांच्या कार्यालय द्वारे गुप्त माहितीच्या आधारे मांडवी येथील पवन गणेश राठोड यांच्या दुकानात रेडटाकून केलेल्या कारवाई मधे मुद्देमालासह आरोपीसअटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनास प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थ पानमसाला सुगंधित तंबाखू गुटखा एकूण रुपये 38,600 चा मुद्देमाल जप्त केला. सदर दुकान पुढील आदेशापर्यंत शील करण्यात आले आहे याप्रकरणी विक्रेता पवन गणेश राठोड राहणार मांडवी . शमी अल्ला खान. साजित अल्हाखान, अस्लम खान ,व अक्रम भटी सर्व राहणार आदिलाबाद यांच्याविरुद्ध भादवि कलम मांडवी येथे 188 .272. 273. 328 व अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आली आहे.
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके,अन्न सुरक्षा अधिकारी श्री ऋषिकेश मरेवार यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्त श्री रमेश कावळे यांच्या मार्गदर्शन केले.


मांडवी परिसरात अनेक खेडेगावांमध्ये गुटखा घरपोच बाईकवरून पुरवठा केला जातो हा लाखोचा गुटका व्यवसाय किराणा दुकानातून राजरोसपणे सुरू असून याकडे संबंधित प्रशासकीय विभाग लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण होत आहे किनवट तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असून या मुळे गुटका हा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे त्याचा व्यवसाय यात तरुण पिढी गुतत्त जात आहे. मटका, गुटखा,दारू अशा अवैध धंद्यांना या परिसरात खेड्यापाड्यात चांगला जम बसविला असून नवीन तरुण मुलाकडून घरोघरी जाऊन मटक्याची पट्टी घेतले जात आहे तर हे असेच चालू राहिले तर गेल्या वर्षी पिंपळगाव फाटा येथे गावकऱ्यांनीच अवैध धंदा विरुद्ध मोर्चा काडून रास्ता रोको केला त्याची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही अशी गावकऱ्यंकडून बोलले जात असून प्रशासनाने वेळी कारवाई करून हे अवैध व्यवसाय बंद करावा असे सुजाण नागरिकांकरून बोलले जात आहे.

180 Views
बातमी शेअर करा