KINWATTODAYSNEWS

वाहतूक पोलिसाची वाकी टाकी हिसकवणाऱ्याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजारांचा दंड

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*: येथील सत्र न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी पोलिसांची वाकी टाकी हिसकावून घेणाऱ्या दोन आरोपी पैकी एकाला तीन वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी बस स्थानक नांदेड कडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाण पुलावर वाहतूक पोलीस अंमलदार तुकाराम खंडू तरटवाड यांनी ड्युटी होती.तरटवाड हे आपले दैनंदिन कामकाज करीत असतांना बस स्थानक कडून माधव किशन सोळंके आणि देविदास पिराजी माटे असे दोन जण आले.पोलीस अंमलदार तरटवाड यांच्या कडील शासकीय वाकी टाकी (दूरभाष यंत्र) यांनी हिसकावून घेतले आणि त्यांच्या सोबत हुज्जत घातली. तेव्हा घडलेला प्रकार त्यांनी आपले तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना सांगितला.माधव किशन सोळंके आणि देविदास पिराजी माटे यांना पकडून त्याबाबत तरटवाड यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिसांनी गुन्हा क्रमांक ५३८/२०२० भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३,३९३,५०६,३४ नुसार दाखल केला.या गुन्हयाचा तपास करून पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक प्रवीण आगलावे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.

न्यायालयात हा सत्र खटला क्रमांक २४/२०२१ सत्र न्यायाधीश एस.इ.बांगर यांच्या समक्ष चालला.खटला दरम्यान न्यायालयाने एक आरोपी देविदास पिराजी माटेला जामीन दिला होता.पण तो खटला प्रक्रियेत हजर राहिलाच नाही.म्हणून माधव किशन सोळंके रा.शेवडी याचा खटला स्वतंत्रपणे चालवण्यात आला.उपलब्ध पुरावा आधारे न्या.बांगर यांनी माधव किशन सोळंकेला दोषी मानले आणि त्यास ३ वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये रोख दंड ठोठावला.या खटल्यात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.आशिष गोदमगावकर आणि ऍड.रणजित देशमुख यांनी मांडली.पैरवी अधिकाऱ्याची जबाबदारी वजिराबादचे पोलीस अंमलदार जितेंद्र तरटे यांनी पूर्ण केली असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगण्यात आले.

59 Views
बातमी शेअर करा