किनवट ता प्र दिनांक 12 शहरातील नागरिकांना बँकिंग सेवा मिळवण्यासाठी तासंतास ताटकळत बसावे लागते आहे, शहरात राष्ट्रीयकृत बँकेचे दोनच शाखा आहेत त्यातील भारतीय स्टेट बँक व कॅनरा बँक ह्या दोन बँका आहेत तर कॅनरा बँकेचा कारभार एकाच कर्मचाऱ्यांकडून चालू असल्याने ग्राहकांना बँकिंग सेवा योग्य प्रकारे प्राप्त होत नाही आहे तर पूर्णवेळ व्यवस्थापक नसल्याने कर्जप्रकाराने व तत्सम बाबी करिता अनेक दिवस वाट पहावी लागत आहे अशा स्थितीत शहरात रस्त्याचे काम चालू असून त्यामुळे इंटरनेट सेवा देखील खंडित होत असल्याने नागरिकांना अनंत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखानी कर्मचारी संख्या वाढवून नागरिकांना चोख बँकिंग सेवा प्रदान करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे . तर या बाबतीत भारतीय स्टेट बँक तर समस्यांचे डोंगरच आहे, त्यांच्या शाखेत 20 हजार रुपये पेक्षा खालचे व्यवहार स्वीकारले जात नाही तर उद्धट बोलणे हे त्या बँकेचे कर्मचाऱ्यांचे अधिकार आहेत अशा अभिरभवात ते कर्मचारी काम करतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडव्हाव्यात ही मागणी केली जात आहे.
कॅनरा बँकेचा कारभार एकाच कर्मचाऱ्यांकडून चालू असल्याने ग्राहकांना होतोय त्रास
452 Views