किनवट/प्रतिनिधी : बसस्थानका समोरील परिसरातील जेष्ठ नागरिक शांताबाई वामनराव बेलखोडे(वय९१) यांचे काल(ता.११) रात्री साडे अकराच्या सुमारास वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुरलीधर, डॉ. अशोक, रिद्धिश्र्वर, केशव बेलखोडे आणि मुलगी सुरेखा बेलखोडे (आंबटकर)
नातू डॉ. विक्रम बेलखोडे, अक्षय बेलखोडे, संकेत आंबटकर नात डॉ. भाग्यश्री बेलखोडे (वरटकर), युगा बेलखोडे (अगळे) डॉ. शिवाणी बेलखोडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव साने गुरुजी रुग्णालयात बुधवारी (ता.१२) सकाळी १० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
त्यानंतर वाहणाद्वारे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र मुरलीधर बेलखोडे , वर्धा यांच्या निवास स्थानी नेण्यात आले.
बेलखोडे परिवाराच्या संकल्पा नुसार पार्थिव शरिर देहदान करण्यासाठीची सर्व कार्यवाही पूर्ण करून दुपारी ३ वाजता जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाचे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय,सावंगी(मेघे) वर्धा च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. त्या साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांच्या आई होत.
शांताबाई वामनराव बेलखोडे(वय९१) यांचे काल(ता.११) रात्री साडे अकराच्या सुमारास वाजता प्रदीर्घ आजाराने निधन
380 Views