KINWATTODAYSNEWS

तळा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सापडलेली सोन्याची चैन केली परत; सरोश गोठेकरचे सर्वत्र कौतुक

तळा,रायगड : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ तृप्ती थोरात यांची दीड तोळा सोन्याची चैन महाविद्यालयाच्या आवारात हरवली होती. कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला सरोश गोठेकर या विद्यार्थ्यांस ती चैन सापडली असता त्यांनी प्राध्यापिका तृप्ती थोरात यांना प्रामाणिकपणे परत केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव मंगेशशेठ देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, गो. म. वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरणशेठ देशमुख, तळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री गोविंद ओमासे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य धुमाळ सर, सर्व, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व तळेवासीयांनी सरोश गोठेकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. तर प्राध्यापिका तृप्ती थोरात यांनी सदर विद्यार्थ्यांस १००० रुपये रोख व पेढ्याचा बॉक्स बक्षीस देऊन आभार व्यक्त केले.

426 Views
बातमी शेअर करा