*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीत जबाब देण्यासाठी जाणाऱ्या एका 70 वर्षीय माणसाचा खून करणाऱ्या स्वस्त धान्य दुकान मालक आणि त्यांच्या नातलगातील पाच आरोपीं पैकी तिघांना उमरी पोलीसांनी पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तिघांना तिन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
दि.5 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्यासुमारास मनुर ता.उमरी या गावातील स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीसाठी आलेल्या मंडळाधिकारी आणि तलाठ्यासमोर जबाब देण्यासाठी मनुर गावातील धोंडीबा शंकर पोलावार (70) हे जात असतांना स्वस्त धान्य दुकान मालक मनुरकर यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील पाच जणांनी मिळून धोंडीबा शंकर पोलावार यांचा खून केला.याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302,143, 147, 149 आणि 341 नुसार गुन्हा क्रमांक 4/2022 दाखल झाला. या गुन्ह्याच्या प्राथमिकीमध्ये शिवाजी मनुरकर राजेश मनुरकर चक्रधर मनुरकर, गणेश मनुरकर आणि गोविंद मनुरकर अशी पाच जणांची नावे होती.
उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी आपल्या सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदारांसह मेहनत करून मेहनत करून फरार पाच आरोपींपैकी राजेश गोपीनाथ मनूरकर त्याचे बंधू चक्रधर गोपीनाथ मनूरकर आणि नातलग शिवाजी दिगंबर मनूरकर या तिघांना पकडले.पकडलेल्या तीन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे