मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मुंबईच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त गोरगरिबांना फळं वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघाचे राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पन्हाळे ,अजय सूर्यवंशी, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, जिल्हाध्यक्ष लहु शिंदे, लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा समन्वयक सुधीर बरुरे, महादेव पोलदासे, अॕड उदय दाभाडे, पत्रकार नितीन चालक, यशवंत पवार, युवा व्याख्याते सुशील सूर्यवंशी, श्रीकांत चलवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्ह्याच्या वतीने संघाचे राज्य सरचिटणीस तथा नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांनी आजच्या पत्रकारितेचे पुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार व शिक्षक उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, किनवटच्या वतीने मदारशातील अनाथ मुलांसोबत पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका सचिव नासिर तगाले, ता.सह सचिव प्रणय कोवे, ता. कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील, शेख अतिफ, प्रसिद्धी प्रमुख गंगाधर कदम, विशाल गिम्मेकर ,सह कोषाध्यक्ष मारोती देवकते, ता.संघटक राज माहुरकर ता. कार्यकारणी सदस्य बाबुराव वावळे, रमेश परचके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसंपादक देवानंद नंदेश्वर व प्रमुख पाहुणे म्हणून नवभारत प्रतिनिधी प्रा. शेखर बोरकर, प्रमुख अतिथी महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक शशिकांत भोयर, पत्रकार संघाचे राज्य महासचिव संजीव भांबोरे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने, पंचम बारबरय्या, सहसचिव प्रविण भोंदे, जिल्हा अध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, मराठी साहित्य परिषद महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष नाशिक चवरे, मानवाधिकार संघटनेचे विदर्भ सचिव महेंद्र तिरपुडे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश हुमने, प्रा. भिमराव बनसोड, शशिकांत देशपांडे, कु. रविना वांढरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, बीड जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेवर चर्चा करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड, सुभाष वाघमारे, जितेंद्र मस्के, सुनील गायकवाड, राजेश सरवदे, मिलिंद गायकवाड, शेख मुख्तार पानगावकर, कबिरा गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवडच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाच्या पिंपरी- चिंचवड महिलाध्यक्षा सौ. मंदाताई बनसोडे, शहर अध्यक्ष शहाजी भोसले, जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दाखले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उमरखेड तालुक्याच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळ, बिस्कीट व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, राज्य उपाध्यक्षा सविता चन्द्रे, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना भोपळे, जिल्हा युवाध्यक्ष मारोती गव्हाळे, उमरखेड तालुका अध्यक्ष हरिदास इंगोलकर, उपाध्यक्ष संदेश कांबळे, सचिव मैनोद्दीन सौदागर, शेख नयूम शेख मोईद्दीन, भागवत काळे, सुनील ठाकरे सविता घुगरे, विवेक जळके, मारोती रावते, गजानन नावडे, अमोल जोगदंड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रजिस्टर, पेन व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष विकास उबाळे, पत्रकार भागवत शिंदे, सागर पवार, बालाजी भांड, नूर शेख व शिक्षक उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, हदगाव तालुक्याच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाततील रुग्णांना फळं वाटप करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. ढगे, सर्व डॉक्टर, नर्स व कर्मचारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष्य राजेश मामीडवार व जिल्हा सरचिटणीस संदीप तुपकरी, हदगाव तालुका अधक्ष्य कैलास तलवारे, महिला जिल्हा आध्यक्षा रूपादेवी पाटील, सुभद्रा डोंगरदिवे, कल्पना देशमुख, गंगासागर ढोले, विकास राठोड, केदार दायमा, कुनाल दस्तुरकर, अरविंद भोरे, तोष्णीवाल संजय, चंद्रकांत गोरे कैलास तलवारे, सिद्धार्थ वाठोरे, तुषार कांबळे आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेजच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा आशाताई चांदणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका सौ. अंजना भिकाजी निमगिरे व माजी सरपंच सौ. उमाताई कन्हेरे, याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार व शिक्षक व शिक्षक उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने वृक्षारोपण व कॅलेंडर वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला पालघर जिल्हाध्यक्ष प्रा.राजेश संखे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.संतोष कोरे, जिल्हा संपर्क प्रमुख श्री.अमेय पिंपळे, जिल्हा सरचिटणीस श्री. मुकेश सिंह, पालघर जिल्हा प्रसिध्दीप्रमुख श्री.परेश संखे, जिल्हा सहसचिव श्री.संजोग संखे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. जितेंद्र सावे, जिल्हा समन्वयक श्री. अतुल वझे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देगलूर तालुक्याच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संघाचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबवून पत्रकार दिन साजरा
99 Views