किनवट ता प्र दि 9 कार्तिक महिन्यात सुरू होऊन पौष महिन्यापर्यंत चालणाऱ्या सुमारे 45 दिवसाच्या अय्यपा स्वामी दीक्षे मधील अंतिम टप्याला सुरवात झाली असून दिनांक 7 जानेवारी रोजी किनवट शहरातील अयप्पा स्वामी मंदिरात महाप्रसाद भंडाऱ्या चे आयोजन करण्यात आले होते तर केरळ राज्यातील शबरलीमला येथील दिव्य ज्योती दर्शनाकरिता किनवट येथून सुमारे 10 वाहनाव्दारे व विमान, रेल्वे व्दारे दीक्षा धारण केलेल्या स्वामींनी प्रस्थान केले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दिसणाऱ्या दिव्य ज्योती नंतर या वर्षीच्या दीक्षेचे समापन होते. त्या दरम्यान ज्या स्वामीने ही दीक्षा पहिल्या वर्षी घेतली त्याने केरळ येथे जावे असे विधान आहे याचं अनुषंगाने सुमारे 10 वाहनाव्दारे व रेल्वे विमानाने स्वामी निघाले आहेत तर यामध्ये काही ज्येष्ठ स्वामींचा देखील समावेश आहे ज्यांचे 18 वर्षे, 22 वर्षे व 25 वर्षे झाली अशा स्वामींचा देखील यात समावेश आहे तर या निमित्ताने किनवट येथे दिनांक 7 जानेवारी रोजी इर्मुडी चा कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये तूप व धान्य हे एका पिशवी मध्ये बांधले जाते ती बांधलेली पिशवी डोक्यावर घेऊन दीक्षा धारण केलेल्या स्वामीला केरळ पर्यंत प्रवास करायचा असतो ज्यामध्ये एक मोठा मार्ग व एक छोटा मार्ग असतो जो जंगलातून असतो व चढाई चा मार्ग असतो तो ही पिशवी डोक्यावर घेऊन चढायचा असतो आशा प्रकारे ही खडतर दीक्षा संपन्न केली जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी किनवट च्या अयप्पा स्वामी मंदिरात केरळ च्या मंदिरा प्रमाणे प्रतिरूप कार्यक्रम आयोजित केला जातो. दिनांक 7 रोजी आयोजित महाप्रसाद भांडाऱ्यात किनवट शहर व प्रतिसरतील नागरिकांची अलोट गर्दी जमली होती व त्यांनी प्रसादाचा लाभ घेतला.
किनवट शहरातील अयप्पा स्वामी मंदिरात महाप्रसाद भंडाऱ्या चे आयोजन
98 Views