किनवट/प्रतिनिधी: दि.०६ जानेवारी मराठी पत्रकार दिवस निमित्त किनवट शहरातील श्री साईबाबा कल्याण मंडपम येथे पत्रकार दिवस आयोजित करण्यात आले होते.या यावेळी पहिले मराठी वृत्तपत्र “दर्पण” कार व पत्रकारितेचे जनक आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांनी अभिवादान केले.तर कार्यक्रमाच्या प्रारंभी नुकतेच निधन झालेल्या अनाथांचे माय जेष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुधाकर कदम प्रमुख अतिथी किनवट चे नगर अध्यक्ष मा.आनंद मच्छेवार,उपनगराध्यक्ष व्यंकट नेमानिवार,किरण तिरमनवार मराठी पत्रकार संघटनेचे वरीष्ठ सल्लागार के.मूर्ती,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाकोडीकर, जिल्हा उपाध्यक्ष किशन भोयर, हे होते.तर या यावेळी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना किनवट चे नगर अध्यक्ष म्हणाले की,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी निर्भीड आणि रोखठोक मते मांडत पत्रकारितेचा पाया घालून दिला असून आज ही पत्रकारांनी त्यांची परंपरा पुढे चालवावी व हे करत असताना घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले महिलांना शिक्षणाचे अधिकार देणारे शिक्षिका क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकले व या महापुरुषांनी केलेल्या कार्याची माहिती सांगितली व पुढे म्हणाले की,गाव,शहर च्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगली भूमिका घेऊन पत्रकारिता केली तर निश्चितच सुधारणेला बळकटी येईल असे मत व्यक्त केले.तर पत्रकारांनी आपल्या लेखणीचा सकारात्मक आणि विधायक पद्धतीने काम करण्यासाठी वापर करावा असे मत विलास सुर्यवंशीनी मत व्यक्त केले. मराठी पत्रकार परिषद नांदेड जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाकोडीकर म्हणाले पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे.याचा वापर योग्य पद्धतीने व्हावा आधुनिक युगात पत्रकारितेचे परिभाषा बदलत चालली आहे.तर समाजात पत्रकारितेचा गंद ही नसणारे मी पत्रकार म्हणून मिरवत आहेत तर हे लोकशाही साठी धोकादायक आहे.खरे तर पत्रकाराने शोध पत्रकारिता करत प्रामुख्याने गोर- गरीब वंचित घटकांवर होणारे अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारे पत्रकारांची गरज आहे व देशाच्या बळीराजा शेतकऱ्यांच्या समस्यावर आपल्या लेखणीने निर्भीड व निरपक्ष लिहणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.तर अनेक मान्यवर सध्याच्या होत असलेल्या पत्रकारितेवर आपआपले मत मांडले.या वेळी प्रमोद पोहरकर, तालुका सचिव प्रकाश कार्लेवाड, सहसचिव किरण ठाकरे,विलास सूर्यवंशी, आशिष शेळके,बालाजी सिरसाट,गौतम येरेकर,आनंद भालेराव,नासिर तगाडे,विजय जोशी,आदी उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन मराठी पत्रकार परिषद किनवट चे तालुका सचिव प्रकाश कार्लेवाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवम पडलवार आदी परिश्रम घेतले.
सकारात्मक भूमिका ठेवून पत्रकारिता केल्यास निश्चितच विकासाला बळकटी येईल* *—- किनवट नगर अध्यक्ष आनंद मच्छेवार यांचे प्रतिपादन
412 Views