KINWATTODAYSNEWS

किनवट प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने मदरशात अनाथ मुलासोबत केला पत्रकार दिन साजरा ; मुलांना खाऊ व मास्क चे वाटप

किनवट/प्रतिनिधी:

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डी.टी.आंबेगावे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष हाजी ईसा खान सरदार खान यांच्या अध्यक्षतेखाली गोकुंदा येथील मदरशात “पत्रकार दिन” साजरा करण्यात आला.

प्रथमतः आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच नुकतेच निधन झालेल्या जेष्ट समाजसेविका, अनाथांची माय पदमश्री स्व.सिंधुताई सपकाळ यांच्या प्रति दोन मिनिटाचे मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर पत्रकार दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष हाजी ईसाखान सरदार खान यांच्या हस्ते पवित्र “कुराण शरीफ”भेट देऊन पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


ऐकतानगर गोकुंदा येथील मदरसा येथील विद्यार्थ्यांना फळे, बिस्किटे व मास्क वाटप करुन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांनी केले. पत्रकार संघा विषयी व पत्रकारा विषयी तालुकाध्यक्ष आशीष शेळके यांनी माहिती सांगितली.


याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ईसा खान सरदार खान यांनी पत्रकारांना संबोधून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांनी ब्रिटिश काळापासून आज पर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहेत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी पुढे आले पाहिजे .पत्रकारांनी स्वच्छ उद्देश ठेवून अन्यायाविरुद्ध लिखाण केले पाहिजे.जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आपली लेखणी झिजवली पाहिजे. पत्रकारांनी आपली प्रतिमा मलिन होऊ न देता समाजासाठी सतत पुढे येऊन आपल्या लिखाणाच्या जोरावर समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे तेव्हाच दर्पणरांना अभिवादन केल्या गत होईल असे ते म्हणाले.

मदरशातील लहान अनाथ बालकांनी सर्व पत्रकारांचे स्वागत गीताने स्वागत केले. सदरील मदरशात किनवटच नव्हेतर किनवट च्या आसपासतील सर्व तालुके, जिल्ह्यातील लहान अनाथ बालके या मदरशांमध्ये शिक्षण घेत आहेत. मदरशांमध्ये सदरील कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ईसा खान साहेब व येथील मौलाना यांनी विशेष सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.

याप्रसंगी मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव,तालुका अध्यक्ष आशिष शेळके तालुका सचिव नासिर तगाले, ता.सह सचिव प्रणय कोवे,ता. कार्याध्यक्ष सय्यद नदीम ,तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील,शेख अतिफ,प्रसिद्धी प्रमुख गंगाधर कदम, विशाल गिम्मेकर ,सह कोषाधक्ष्य मारोती देवकते,ता.संघटक राज माहुरकर ता. कार्यकारणी सदस्य बाबुराव वावळे,रमेश परचके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

97 Views
बातमी शेअर करा